फेसबुक अकाउंट हॅक करण्यासाठी वापरली जाणारी एक नवी (Creative!) टेक्निक !


फेसबुकवर एक नोटिफिकेशन आले. 24 hours left for review why shared your post. सोबत नोटिफिकेशन चे त्रिकोणी चिन्ह. (पहिला स्क्रीनशॉट)


नोटिफिकेशन वर क्लिक केल्यावर त्यावर एक लिंक दिली आहे. आणि अकाउंट तात्पुरते बॅन केले आहे व लगेचच लिंकवर क्लिक करून माहिती भरा (urgent action required) असे सांगितले आहे. (दुसरा स्क्रीनशॉट)


घाबरून जाऊन जर लिंकवर क्लिक केले तर तुमचा गेम झालाच म्हणून समजा.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================


वरवर पाहता फेसबुक कडून आलेले नोटिफिकेशन वाटते. पण एवढं क्रिएटिव्ह काम केलं आहे पठ्ठ्यांनी की बस !


त्यांनी एक फेसबुक अकाउंट बनवले आहे 24 hours left for review why या नावाने. त्रिकोणी चिन्ह (warning sign) हे प्रोफाइल पिक्चर आहे. (तिसरा स्क्रीनशॉट)


आता या प्रोफाइल वरून अनेकांच्या video post शेअर केल्या आहेत आणि प्रत्येक मेसेज मध्ये urgent action required ची लिंक दिली आहे. मी प्रोफाइल चेक केले तेव्हा बऱ्याच "मराठी" पेजेसला ही लिंक पाठविली आहे असे दिसले म्हणून मुद्दाम ही पोस्ट लिहिली आहे. (इतर सर्व स्क्रीनशॉटस)
अशा वॉर्निंग पोस्ट ओळखायला शिका. लिंकवर क्लिक करू नका.


त्या लिंकवर केल्यावर फेसबुक सारखे दिसणारे पेज उघडेल. पण ते खरे फेसबुक नसेल. तिथे लॉगिन केल्यावर लगेच तुमचे अकाउंट hack होईल.


मग पेज परत मिळविण्यासाठी पैसे मागतील, मित्रमंडळींकडून पैसे मागतील, तुमच्या नावाने अश्लील/चुकीच्या पोस्ट्स टाकून आणखी लोकांना जाळ्यात ओढले जाईल... असे बरेच काही होऊ शकेल.


कोणतेही किचकट सॉफ्टवेअर न वापरता, फोन ईमेल न वापरता...केवळ फेसबुक अकाउंट बनवून त्यातून हजारो फेसबुक वापरकर्त्यांना फसवून लाखो कमावण्याची ही idea भन्नाट आहे. त्यामुळे hacker ला दाद दिल्या शिवाय राहवत नाही.


पण आपण सतर्क राहूया, सुरक्षित राहूया.


बघा, जमलं तर शेअर करा ! (माझं नाव काढून शेअर केले तरी हरकत नाही !)


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !