There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९३७ मध्ये, रॉबर्ट मॅकनमारा यांनी विद्यापीठातून अर्थशास्त्र, गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांत बी.ए.ची पदवी घेतली
त्यानंतर त्यांनी हार्वर्डमधून एम.बी.ए. केले आणि तेथेच अकाऊंटिंग शिकवले; ते हार्वर्डचे सर्वाधिक पगार घेणाऱ्यांपैकी एक आणि सर्वात तरुण सहाय्यक प्राध्यापक बनले.
१९४३ मध्ये, त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि सैनिकांना विश्लेषणात्मक (Analytical) दृष्टिकोन शिकवला. त्यानंतर ते ‘ऑफिस ऑफ स्टॅटिस्टिकल कंट्रोल’मध्ये हवाई दलात कर्नल झाले.
१९४६ मध्ये, त्यांनी फोर्ड कंपनीत प्रवेश केला. त्यांनीच फोर्डमध्ये संगणक स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली, ज्याला ते ‘वैज्ञानिक व्यवस्थापन’ (Scientific Management) म्हणत.
ते यात इतके कुशल होते की पुढे ते फोर्डचे अध्यक्ष बनले.
ते एक तेजस्वी व्यक्ती होते, ज्यांना वाटत होते की प्रत्येक समस्येचे उत्तर केवळ डेटा विश्लेषणामध्ये (data analysis) आहे.
१९६० मध्ये, राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी त्यांची संरक्षण सचिव (Secretary of Defence) म्हणून निवड केली. संगणकीय मॉडेलिंगच्या (computer modelling) माध्यमातून, स्प्रेडशीट्स, आलेख (graphs) आणि ट्रेंड्स वापरून आपले काम करणारे ते पहिले संरक्षण सचिव होते.
त्यांच्या डेटामुळे (माहितीमुळे) त्यांना खात्री पटली होती की व्हिएतनाममधील युद्ध अमेरिकेच्या दृष्टीने चांगले चालले आहे.
१९६२ मध्ये, ते म्हणाले, “प्रत्येक Data point दाखवतोय की आपणच हे युद्ध जिंकत आहोत.”
मॅकनमारा यांच्या अंदाजानुसार, युद्ध १९६४ पर्यंत संपले पाहिजे होते.
परंतु १९६५ पर्यंत युद्ध संपले नव्हते आणि प्रत्यक्षात अमेरिका हरत होती.
तरीही, मॅकनमारा यांच्या डेटा विश्लेषणानुसार युद्ध जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अमेरिकेने युद्धात आणखीन पुढे जाणे (escalate) हाच होता.
हे यद्ध इतके वाढले की याला ‘मॅकनमाराचे युद्ध’ (McNamara’s War) म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
त्यांना खात्री होती की डेटा खोटं बोलणार नाही. आपलाच विजय होत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जो डेटा पॉईंट निवडला तो होता Body Count. म्हणजेच जास्तीत जास्त शत्रूंना ठार करणे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
अशा प्रकारे, ‘बॉडी काउंट’ हे स्प्रेडशीटवरील सर्वात महत्त्वाचे मापन (metric) बनले, जे अमेरिकेचा विजय सिद्ध करेल—कारण ‘संख्या खोटे बोलत नाहीत’ असा त्यांचा ठाम विश्वास होता.
याचा थेट परिणाम असा झाला की प्रत्येक लष्करी तुकडीचे मुख्य उद्दिष्ट सर्वाधिक ‘बॉडी काउंट’ साध्य करणे हे बनले. संगणकाद्वारे संख्यांच्या आकडेवारीवर आधारित (quantitative style) निर्णय घेणाऱ्या मॅकनमारा यांना त्यातील मानवी पैलू (human dimension) लक्षात आला नाही.
बॉडी काउंट’मुळे सैनिकी तुकड्यांमध्ये वेगळीच स्पर्धा निर्माण झाली. बॉडी काउंट’च्या या वेडामुळे जास्त संख्या नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळू लागली, ज्यामुळे शत्रूच्या नुकसानीची संख्या फुगवण्यास (exaggeration) सुरुवात झाली.
सैनिक न मारलेल्या शत्रूंना मारल्याचा दावा करू लागले, अधिकारी ती संख्या आणखी वाढवू लागले आणि असेच साखळी पद्धतीने (up the chain of command) वरपर्यंत होत गेले.
उच्च अधिकाऱ्यांनी आकड्यांवर भर दिला, तर त्यांना आकडेच मिळाले.
त्यामुळे हा डेटा निरुपयोगी ठरला, कारण तो खोट्या माहितीवर आधारित होता. चुकीच्या डेटावरून घेतलेले निर्णयही चुकीचेच ठरत होते.
शेवटी, मॅकनमारा यांनाही मान्य करावे लागले की ज्या मॉडेल्स आणि आकडेवारीला त्यांनी इतके महत्त्व दिले होते, ते “मोठ्या प्रमाणावर चुकीचे” (grossly in error) होते आणि “आपले सध्याचे धोरण केवळ विनाशकारी पराभवाकडे नेऊ शकते,” याची आता त्यांना खात्री पटली होती.
असे तेव्हाच घडते, जेव्हा आपण केवळ डेटा आणि संगणकांवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतो.
सिस्टम कितीही परफेक्ट वाटली तरी ती वापरणारे लोकच त्या सिस्टमची परिणमकारकता ठरवतात.
म्हणूनच जेव्हा जेव्हा एखाद्या प्रणालीमध्ये अपेक्षित परिणाम मिळत नसतील तेव्हा प्रामुख्याने ती प्रणाली चालविणाऱ्या / वापरणाऱ्या लोकांचा अभ्यास करा....खरे गुपित तिथेच दडलेले असते.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !