एक अद्भुत कहाणी - ६९ वर्षांच्या वयात १२,००० करोडची कंपनी सुरू करणाऱ्या माणसाची!

वय वर्षे ६ ९ असताना निवृत्तेचे वेध लागतात. पण ध्येयवेड्या माणसांना वय कधीच आडवं येत नाही. आपल्या देशात असे अनेक हिरे आहेत पण मीडिया पासून दूर राहून आपले काम मनापासून करण्याच्या वृत्तीमुळे सामान्य लोकांना फारसे माहित नसतात. भारतातील असाच एक हिरा आहेत श्री. अशोक सूता !

१. अशोक सूता यांना IT industry मधला magic man म्हणून ओळखलं जायचं. १९७८ मध्ये त्यांनी Shriram Refrigeration चे CEO म्हणून पदभार स्वीकारला. सलग चार वर्षं तोटा दाखवणारी कंपनी त्यांनी पाचव्या वर्षांत फायद्यात आणली.

२. १९८४ मध्ये ते Wipro Infotech चे president झाले. १५ वर्षांत त्यांनी कंपनीचा revenue २२ करोड वरून २२०० करोड पर्यंत वाढवला! इतका की त्यांच्या स्पर्धक कंपनी Intel चे CEO Andy Grove यांनी त्यांना appreciation letter पाठवलं.

============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -https://salil.pro/MBA
============================
३. पण अशोक यांच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. १९९९ मध्ये त्यांनी इतर ९ IT professionals सोबत Mindtree ची स्थापना केली. सहा वर्षांत कंपनीचा revenue ४५५.३७ करोड झाला. २००७ मध्ये त्यांनी २३७.७२ करोडचा IPO आणला जो ११० पट oversubscribe झाला!

४. पण नंतर गोष्टी बिघडल्या. revenue ची वाढ मंदावली, targets चुकले, आणि M&A strategy वरून मॅनेजमेंट मध्ये मतभेद झाले. २०११ मध्ये त्यांनी Mindtree मधून राजीनामा दिला. ६९ वर्षांचे असूनही ते थांबले नाहीत तर पुढच्या प्रवासाचा विचार करत होते.

५. त्यांना अशी कंपनी बनवायची होती जिथे कर्मचारी आणि ग्राहक दोघांच्या happiness ला प्राधान्य असेल. राजीनामा दिल्यानंतर एका महिन्यातच त्यांनी परत काही पार्टनर्ससोबत नवीन कंपनी सुरू केली - Happiest Minds Technologies!

६. त्यांची vision साधी होती - एक अशी mindful IT कंपनी जी cloud computing, social media, mobility, analytics या क्षेत्रात काम करेल. २९ ऑगस्ट २०११ ला कंपनीने काम सुरू केलं.

७. तीन महिन्यांतच US, UK आणि India मधून customers मिळाले. Bangalore, New Jersey आणि Reading मध्ये नवे ऑफिसेस उघडले. नोव्हेंबर २०११ मध्ये Cannan Partners आणि Intel Capital कडून २२८ करोड funding मिळवली.

८. त्यांनी "Born Digital" approach वापरला. परंपरागत IT products ला AI, IoT, analytics सोबत mix करून विकलं. MongoDB आणि Mastercard सारख्या global partnerships केल्या.

९. २०१८ पर्यंत revenue ४६०.२३ करोड झाला. २०२० मध्ये त्यांचा ७०२ करोडचा IPO १५१ पट oversubscribe झाला - त्या वर्षातला सर्वात यशस्वी IPO!
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -https://salil.pro/MBA
============================
१०. आज Happiest Minds ची वार्षिक कमाई १७१०.०३ करोड आहे आणि कंपनीची किंमत १२,२७६ करोड आहे. अशोक सूता यांना आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले. पण त्यांना ओळखलं जातं ते Parkinson's आणि Alzheimer's disease वरच्या संशोधनासाठी त्यांनी ३७५ करोड दान दिल्याबद्दल.

अशी आहे या extraordinary माणसाची कहाणी, ज्यांनी वयाची ६९ वर्षं उलटल्यावरही नवं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं! 🙏

टीम नेटभेट