तुम्ही या संकटांकडे कसं पाहता एक आवाहन की संधी ?

१९८६ च्या दरम्यान शेअर मार्केट पडले होते त्या वेळी स्टिव्ह जॉब्स यांना स्वःताकडील पैसे संपत असल्याचे जाणवले. त्यात १९८५ मध्ये त्यांना अ‍ॅपल मधून काढण्यात आले, अशा परिस्थितीत पैसा उभा करण्यासाठी त्यांनी त्यांचे शेअर्स विकले आणि आपला बहुतेक पैसा NEXT कंप्युटर्स च्या स्थापनेसाठी लावला.

अ‍ॅपलच्या गोंधळात अडकून पडण्याऐवजी किंवा NEXT बरोबर संघर्ष करण्याऐवजी स्टिव्ह जॉब्स यांनी त्यांच्या उरलेल्या १० मिलिअन डॉलर्स मध्ये जॉर्ज लुकाझ अ‍ॅनिमेशन स्टुडीओ खरेदी करुन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला.

याच स्टुडीओ ला पुढे पिक्झार (Pixar') म्हणून नाव देण्यात आले, त्यांच्या याच स्टुडीओ बरोबर ३ वर्षानंतर डिसनीने तब्बल २६ मिलिअन डॉलर्स ची डील केली आणि हाच स्टुडीओ डिसनीने २००६ साली ७.४ बिलिअन डॉलर्स मध्ये विकत घेतला.

२००१ च्या दरम्यान डॉट-कॉम चे दिवाळे निघाले होते, जेफ बेझॉझ यांच्या अ‍ॅमॅझॉन ला त्यांच्या किंमतीमध्ये जवळजवळ ९०% चं नुकसान झाले होते. बाकीच्या डॉट.कॉम कंपन्यांप्रमाणे अ‍ॅमॅझॉनसुध्दा बंद होते कि काय असे वाटत असतानाच , जेफ यांनी इन्व्हेस्टर्स कडून पैसे घेण्याऐवजी स्वतःच्या बिझनेस मधूनच पैसा कसा निर्माण करता येईल याकडे आपले लक्ष केंद्रीत केले.

त्यांनी फक्त एका गणिताकडे लक्ष दिले ते म्हणजे अ‍ॅमॅझॉनची पैसा रुपांतरणाची सायकल (Cash Conversion Cycle)

पैसा रुपांतरणाची सायकल म्हणजे रिटेलर पैसा स्टॉकमध्ये रुपांतर करण्यासाठी वेळ घेतो आणि नंतर स्टॉक विकल्यानंतर पुन्हा पैशामध्ये रुपांतर करतो. मॅक्सीझ ची CCC ७१ दिवसांची आहे तर वॉल-मार्ट ची CCC १२ दिवसांची आहे.

या संकटा दरम्यान, जेफ यांनी खरेदीदारांकडून पैसे मिळवले आणि स्टॉक विकून २८ दिवसांनी स्टॉकसाठी पैसे दिले यामुळे अ‍ॅमॅझॉन ची CCC निगेटीव्ह २४ दिवसांमध्ये बदलण्यात
त्यांना यश आलं. हेच पुढे अ‍ॅमॅझॉन च्या वाढीसाठी गुपित ठरले.

जितक्या वेगाने ते वाढत गेले तितकाच जास्त त्यांनी स्टॉक पेक्षा पैसा निर्माण केला, आज अँमॅझॉन ची किंमत ८६५ बिलिअन डॉलर्स इतकी आहे (या आठवड्यातील मार्केट क्रॅश नंतर) आणि जेफ बेझॉझ हे जगातिल सर्वात श्रिमंत व्यक्ति आहेत.

२००८ हे जागतिक आर्थिक संकटाचे वर्ष होते त्यावेळी इलॉन मस्क म्हणाले होते कि " हे माझ्या आयुष्यातील नक्कीच सगळ्यात वाईट वर्ष आहे." पेपाल, टेस्ला आणि सोलार सिटी विकून मिळवलेले १८० मिलिअन डॉलर्स खर्च केल्यानंतर त्यांच्याकडील पैसा संपला होता. ते म्हणतात कि त्या वेळी ते इतके खचले होते कि त्यांना वाटत होतं कि ते चिंताग्रस्त (Nervous) ब्रेकडाउन मध्ये आहेत.

आपल्या कंपन्या बंद करण्यापेक्षा त्यांनी शपथ घेतली कि ते एक तर या सर्व कंपन्यांना यश्स्वी होताना बघतील किंवा त्यांच्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करतील. ती त्यांची वचनबध्दता आणि त्यावर त्यांनी केलेली कृती त्यामुळे २३ डिसेंबर ला त्यांना नासा कडून फोन आला आणि सांगितल गेलं कि ते १.५ बिलिअन डॉलर्स च काँन्ट्रॅक्ट जिंकले आहेत. दोन दिवसांनंतर, टेस्ला च्या इन्व्हेस्टर्स नी त्यामध्ये अजून पैशाची भर टाकली त्यानंतर त्यांच्या तिन्ही कंपन्या अशा वाढीस लागल्या कि आज इलॉन यांची किंमत ३४ बिलिअन डॉलर्स इतकी आहे

जेव्हा याच संकटांमुळे बाकि सर्व घाबरले होते तेव्हा हे तिन्ही उद्योजक आपापल्या पध्दतीने संकटाला सामोरे जाण्यास तयार होते. त्यावेळी त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे त्यांनी फक्त त्यांच्याच नाही तर आपल्या जगाला सुध्दा नविन आकार दिला.

आज उभ्या असलेल्या संकटादरम्यान तुम्ही कुठे पाहताय आतमध्ये कि बाहेर ?
तुम्ही यासाठी माध्यमांना कारणीभुत ठरवताय कि तुमची उत्कृष्टता दाखवण्याची एक संधी समजताय ?

आपण या दशकातील एका संकटामध्ये जगत आहोत. तुम्ही आज जे करणार आहात यावरुन फक्त तुमचं या वर्षाचं भविष्य ठरणार नाही तर यावरुन तुमच्या पुर्ण दशकाचं भविष्य ठरणार आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी तुमचा वेळ घ्या आणि मगच कृती करा.

" संकट एखाद्याचं व्यक्तिमत्व निर्माण करत नाही तर , तर ते एखाद्याचे व्यक्तिमत्व उघड करते."
-डेनिस लिअरी


================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com