या तीन गोष्टींसाठी कायम ऋणी रहा

मित्रांनो, 

माणसाने आपल्या जीवनात कृतज्ञ असणे फार महत्त्वाचे आहे. नियतीने कोणासाठी काय ठेवलंय कोणालाच माहिती नाही, मात्र माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनातील सद्भावना सोडू नयेत हेच खरं. 

खाली दिलेल्या या 3 गोष्टींसाठी तरी माणसाने कायम ऋणी असलं पाहिजे - 

1. आज जे तुम्हाला मिळालंय, त्याच गोष्टींसाठी जगात कोणी ना कोणी देवाकडे सतत प्रार्थना करतंय, त्यामुळे तुम्हाला जे नशिबाने मिळालंय त्यासाठी कायम ऋणी रहा. 

2. कधीकधी नशीबाने वरदान मिळून जातं. मात्र कधीकधी एखाद्या दिवशी नशीबाने घडवलेली अद्दल हेच वरदान ठरू शकतं. ते ओळखायला शिका आणि त्यासाठी देवाचे कायम आभार माना.

3. काही वाईट दिवस म्हणजे पूर्ण जीवन वाईट असं नसतं. त्यामुळे वाईट दिवसांनी गोंधळून जाऊ नका. येणाऱ्या काळासाठी उमेद धरा आणि मिळालेल्या जीवनासाठी आभार माना.