एआय सर्व आजार बरे करू शकेल का?

Google DeepMind चे CEO डेमिस हसबिस यांना असं वाटतंय की AI जवळपास सर्वच आजार बरे करू शकेल ! — आणि ते देखील शंभर वर्षांत नाही, तर फक्त पुढच्या दहा वर्षांत!

अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आरोग्यसेवेमधील वेळ कमी करण्याचं काम एआय करतंय. ज्या गोष्टींना पूर्वी दशके लागायची — जसं की प्रोटीन मॅपिंग — त्या आता काही महिन्यांत पूर्ण होत आहेत. त्यांच्या AlphaFold टीमने तब्बल २० कोटी प्रोटीन स्ट्रक्चर्स शोधून काढले. ही कामगिरी करण्यासाठी सामान्य मानवी संशोधकांना अब्जावधी तास लागले असते!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IBWPzOHwlSmJtDY3wUyW0y
येथे क्लिक करा.
================

👉 विचार करा — मागील शतकभरात सर्व मानवी शास्त्रज्ञांनी मिळून जितकी प्रोटीन स्ट्रक्चर्स सोडवली, त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर्स AlphaFold सारख्या एआय टूल्सनी आधीच सोडवले आहेत!
पण हे फक्त एका विशिष्ट यशापुरतं मर्यादित नाही.
एआय आता औषध चाचण्या सिम्युलेट करू शकतं, लाखो-कोट्यवधी रुग्णांचा डेटा विश्लेषण एकत्र करू शकतं, आजारांचे नमुने ओळखू शकतं आणि संशोधनासाठी लागणारा वेळ व संसाधनांचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी करू शकतं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IBWPzOHwlSmJtDY3wUyW0y
येथे क्लिक करा.
================
✅ आता वर्षानुवर्षे चालणारी ट्रायल-अ‍ॅण्ड-एरर पद्धत टाळता येणार आहे.
✅ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
✅ एआय जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि वास्तविक जगातील डेटामधील असंबंधित गोष्टीही एकत्र जोडू शकतो — आणि तेही मोठ्या प्रमाणात!
आपण पहिल्यांदाच विज्ञानाच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे आजारांवर उपचार नाही, तर ते कायमचे बरे करणं शक्य होऊ शकतं.


तुमचं काय मत आहे — आपण हे खरंच पुढच्या १० वर्षांत करू शकू का?

सलिल सुधाकर चौधरी.

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !