There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
क्या आप कमेंट्स करते हो? आप कमेंट्स क्यो नही करते हो?
तुम्ही फेसबुकवर अनेक पोस्ट वाचता. त्यापैकी किती पोस्ट्स वर कमेंट्स करता? म्हणजे जर रेशिओ काढायचा असेल तर १०० पैकी किती पोस्ट वर कमेंट्स करता ?
फेसबुकने आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. reactions, shares आणि comments .
reactions म्हणजे likes. हा सगळ्यात कमी कष्टाचा पर्याय. फक्त अंगठ्यावर टिचकी मारली. तर काम होते.
शेअर करणे हा मध्यम कष्टाचा मार्ग. ही पोस्ट माझ्या फेबुमित्रांना आवडेल का ? याचा विचार करून नंतर टिचकी मारावी लागते.
तिसरा कमेंटचा मार्ग . हा सर्वात कठीण. ही पोस्ट प्रतिक्रिया देण्यायोग्य आहे का हे ठरवणे, त्या प्रतिक्रियेला योग्य शब्दात मांडणे आणि नंतर विचारपूर्वक पोस्ट करणे ही थोडी वेळखाऊ पद्धत आहे.
फेसबुक मध्ये येणाऱ्या असंख्य पोस्टपैकी कोणत्या तुम्हाला दाखवायच्या यासाठी फेसबुक अल्गोरिदम हीच काठिण्य पातळी वापरतात. थोडक्यात ज्या पोस्ट्सवर जास्तीत जास्त कमेंट येतात (views to comments ratio). त्या पोस्ट जास्त लोकांना दाखविल्या जातात.
आता हे कमेंटशास्त्र का एवढे खोलात जाऊन पाहायचे ते बघूया ?
फेसबुक मध्ये विनामूल्य मनोरंजक किंवा माहितीपूर्ण कंटेंट मिळते. ज्या प्रकारचे कंटेंट आपल्याला जास्त पाहायला आवडेल त्यावर कमेंट्स अवश्य करा.
बऱ्याच वेळा पोस्ट्स अशा लिहिल्या जातात त्यामध्ये मुद्दाम तुम्हाला राग येईल किंवा भावना दुखावल्या जातील जेणेकरून तुम्ही कमेंट कराल. आणि पोस्ट वायरल होईल. त्यामुळे अशा पोस्ट्सवर बिलकुल कमेंट्स करू नका ज्या तुम्हाला स्वतःला आवडत नाहीत. त्याच पोस्टवर कमेंट्स करा ज्या तुम्हाला उपयुक्त वाटतात किंवा आवडतात.
कमेंट्सचा एक छुपा वापर आहे. ज्या पोस्ट तुम्ही स्वतः करता त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांच्या पोस्टवर कमेंट करत जा. जेवढे तुम्ही engaged creator असाल तेवढे तुमच्या पोस्ट्स इतर लोकांना दिसतील.
कमेंट्स करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपले communication सुधारण्याचा मार्ग.आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते शब्दांत मांडणे ही एक कला आहे. केवळ एका शब्दांत छान/nice अशा कमेंट्स न देता aple मत काही ओळीत मांडणे ही फ्री ट्रेनिंग आपल्याला फेसबुक कमेंट्स मध्ये मिळते.
समजा एखाद्या क्रिएटरच्या पोस्ट्स तुम्हाला आवडतात. पण तुम्ही like केले , कॉमेंट केले नाही. तर हळूहळू त्या क्रिएटरचे मोटीवेशन कमी होत जाईल आणि चांगल्या पोस्ट्स दिसण्याचे कमी होईल. म्हणजे नुकसान वाचणाऱ्याचे पण होईल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
थोडक्यात कमेंट्स म्हणजे तुम्ही क्रिएटरला दिलेले मानधन आहे. ज्यासाठी पैसे खर्च होत नाहीत.
आणखी एक मुद्दा. सोशल मीडिया मध्ये आपण सर्वजण खूप वेळ घालवतो कारण आपली संवादाची भूक सोशल मीडिया पूर्ण करतोय. पूर्वीसारखे मायेने किंवा विश्वासाने पाठीवर हात ठेवणारे कुणीही उरलेले नाही. जेव्हा आपण एखाद्याच्या पोस्टवर व्यक्त होतो, सल्ला देतो, स्तुती करतो, विश्वास दाखवतो तेव्हा आपण क्रिएटरच्या पाठीवर हात ठेवत असतो. ऋणानुबंध तयार करत असतो. साधारण सात interactions नंतर लोकांची ऑनलाईन ओळख प्रत्यक्ष भेटीईतकीच पक्की होते.
कमेंट्स का करायच्या हे तर आपण सविस्तर पाहिलं. आता कमेंट्स कशा करायच्या ते पाहूया -
एका सोशल मीडिया एक्स्पर्टचा मी व्हिडिओ पाहत होतो.त्याने सांगितलं की तो पोस्टमध्ये मुद्दाम काही चुका ठेवतो. कारण लोकांना चुका काढायला आणि त्या दुरुस्त करायला आवडतात.आणि त्यामुळे मला आपोआप जास्त कमेंट्स मिळतात.
थोडक्यात काय तर चूक शोधण्याची ही प्रवृत्ती सोशल मीडियावर दिसते. त्याऐवजी चांगलं शोधण्याची सवय स्वतःला लावून किंवा काहीतरी value add करण्याची सवय आपण लावून घेतली तर आपलाच दृष्टिकोन बदलता येऊ शकतो. हीच सवय आपल्याला आयुष्य सुंदर करण्यासाठी मदत करते. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी!
सोशल मीडिया पोस्ट्स हे काही संदर्भ ग्रंथ किंवा शोधनिबंध नसतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यात असेलच असे नाही. कमेंट्स करणाऱ्याने हे समजून घेतले पाहिजे. पोस्टमध्ये जे नाही त्यावर कमेंट्स करण्याऐवजी जे आहे त्यावर context समजून कमेंट्स करा.
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो. त्यामुळे इतरांचा विचार समजून घ्या. लगेच एखाद्याची अक्कल, जात, धर्म, शिक्षण काढणे मूर्खपणाचे तर आहेच सोबत आपल्या कोत्या मनाचेही लक्षण आहे.
मी गेले काही दिवस अनेक परदेशी शोध/ कल्पनाशक्तींची उदाहरणे असलेल्या पोस्ट करतो आहे. त्यात काही जणांच्या कमेंट्स होत्या की आपल्याकडे एवढी उदाहरणे आहेत त्यावर पोस्ट लिहा. किंवा फक्त परदेशी लोकांना मोठं का करता? काही कमेंट्स होत्या की केवळ शिवाजी महाराजांवर पोस्ट लिहा आपल्याला त्याचीच गरज आहे.
अशा तुलनात्मक कमेंट्स फारशा फलदायी ठरत नाहीत. परदेशी संशोधनाबद्दल लिहिणे हा उद्देश नसून सहसा माहीत नसलेल्या संशोधनाबद्दल मी लिहीत आहे. आपल्याकडील बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहीत आहेत/असाव्यात. त्यामुळे केवळ आपले तेच पाहण्याची कुपमंडूक वृत्ती सोडून दिली पाहिजे.
जे शिकण्यासारखे आहे , चांगले आहे ते घ्यावे आणि पुढे जावे. कमेंट्स करताना हे भान ठेवले तर सोशल मीडियाचा अनुभव सर्वांसाठीच आनंददायी होईल. त्याला नळावरच्या भांडणाचे स्वरूप येता कामा नये. न रागावता, दुसऱ्याचा अपमान कधीही न करता, टोमणे न मारता, स्पष्ट आणि सकारात्मक चर्चा कशी करावी हे शिकण्यासाठी फेसबुक कमेंट्स सारखे चांगले साधन नाही. लाखमोलाचे हे साधन आपण बिलकुल वाया घालवू नये.
शेवटचा मुद्दा - जास्तीत जास्त तीन वेळा आपल्या कमेंटवर प्रत्युत्तर दयावे (शक्यतो दोनच पुरे !) . त्या पलीकडे कितीही प्रयत्न केले तरी आपला मुद्दा पटवून देणे शक्य नसतेच. तो नाद तिथेच सोडला तर बहुमूल्य वेळ वाचेल. आपली आणि इतरांची मनस्थिती देखील बिघडणार नाही.
तर मग कमेन्टशास्त्र अंगी बाळगणार ना ? सुरुवात याच पोस्टपासून करा. आणि हो, तुमचे स्वतःचे काही कमेन्टशास्त्र असेलच ना ते ही मांडा. "तंटामुक्त सोशल मीडिया" सत्यात उतरवूया !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!