पोर्टफोलियोमध्ये नेमके किती शेअर्स असावेत?

प्रत्येक शेअर गुंतवणूकदाराच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो: "माझ्या पोर्टफोलियोमध्ये नेमके किती शेअर्स असावेत?"

पोर्टफोलिओ मध्ये कमी शेअर्स असले, तर एकाच शेअरच्या खराब कामगिरीमुळे पूर्ण पोर्टफोलियोवर परिणाम होऊ शकतो. आणि खूप जास्त शेअर्स असले, तर एखाद्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेअरचा म्हणावा तास फायदा पोर्टफोलिओला होत नाही. मग, नेमकी योग्य संख्या किती?

या महत्वाच्या प्रस्नावर नेमके उत्तर नाही, मात्र काही मार्गदर्शक तत्वे आहेत जी वापरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.

मार्गदर्शक तत्व १: किमान पाच शेअर्स
वेगवेगळ्या क्षेत्रांतील वैविध्याचा लाभ मिळविण्यासाठी (Diversification) कमीतकमी पाच वेगवेगळ्या उद्योगांतील (Sectors) शेअर्स असणे आवश्यक आहे, ज्यामुळे जोखीम कमी होते.

मार्गदर्शक तत्व २: जास्तीत जास्त तीस शेअर्स
२०-३० शेअर्स नंतर Diversification चे फायदे कमी होत जातात. ३० पेक्षा जास्त शेअर्स असले तर ते जोखीम कमी करत नाहीत. याउलट पोर्टफोलियो हाताळणे देखील अवघड होते.

मार्गदर्शक तत्व ३: अभ्यासाची मेहनतप्रत्येक शेअरचा नियमितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे, जसे की तिमाही अहवाल वाचणे आणि बातम्यांवर लक्ष ठेवणे. तेवढेच शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये असुद्या ज्यांचा अभ्यास करणे, आणि लक्ष ठेवणे शक्य होईल.

मार्गदर्शक तत्व ४: शक्यतो २० किंवा त्यापेक्षा कमी शेअर्स ठेवण्याचा प्रयत्न करा
५ ते ३० शेअर्सच्या मर्यादेत शक्यतो कमीत कमी १५-२० शेअर्स ठेवा. यामुळे Diversification चा फायदा पण होईल आणि पोर्टफोलियो मधील सर्वच शेअर्समध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक करता येईल.

चांगला शेअर्स पोर्टफोलियो कसा तयार करावा:

1. आधी घेतलेल्या शेअर्सवर लक्ष द्या:
बरेच गुंतवणूकदार नेहमी गुंतवणुकीसाठी नवीन, अधिक आकर्षक संधी शोधत असतात. मात्र नवीन शोधण्यापूर्वी आधीच चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे ठरते.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
================
2. खराब कामगिरी करणारे शेअर्स जास्त दिवस जवळ बाळगू नका:
नियमितपणे पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा आणि सतत खराब कामगिरी करणारे शेअर्स विक्री करा. तोट्यात असणारे शेअर्स पुन्हा कधीतरी वाढतील म्हणून न विकण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. तसे न करता जर शेअरच्या मूलभूत बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल तर तो शेअर विकलेला चांगला.
3. नवीन शेअर्स घेण्याआधी खूप खूप खूप विचार करा :
सध्याच्या पोर्टफोलियोमध्ये चांगल्या संधी नसतील तरच नवीन शेअर्स घ्या. उगाचच पोर्टफोलिओ वाढवू नका. असं समजा की तुम्हाला जास्तीत जास्त एकच नवा शेअर दरवर्षी घेता येईल असा नियमच आहे. (प्रत्यक्षात असा नियम नाही!). स्वतःला असा काटेकोर नियम घालून घेतल्याने अति आणि चुकीची खरेदी नाही होत.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.

योग्य शेअर्सची संख्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी वेगळी असू शकते, Diversification चे फायदे आणि अभ्यासाची क्षमता यांच्यात समतोल राखणे महत्वाचे आहे. नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवातीला कमी शेअर्स ठेवावे. आणि शेअर निवडणे व अभ्यास करणे शिकावे. जसा जसा अनुभव आणि अभ्यास वाढेल तसे गुंतवणूकदार मोठे पोर्टफोलियो अधिक प्रभावीपणे हाताळू शकतात.

टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स