सातत्य आणि चिकाटीचे उदाहरण - एलोन मस्क

मित्रांनो आज इतिहासात एक महत्त्वाची नोंद होणार आहे. नासा NASA संस्था आज एका अवकाश वीराला अवकाशात पाठवत आहे. अर्थात ही फार मोठी बाब नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे एका खाजगी कंपनीने बनविलेल्या अवकाश यानातून प्रथमच माणूस अवकाशात झेप घेणार आहे. आणि ही खाजगी कंपनी म्हणजे अवलिया एलोन मस्क याची स्पेस एक्स ही कंपनी होय.

काही वर्षांपूर्वी नासाने दोन खाजगी कंपन्यांना अवकाश यान बनवण्यासाठी कंत्राट दिले होते. यासाठी बोईंग या बलाढ्य कंपनीला 4.3 बिलियन डॉलर्स व स्पेस एक्स या अनोळखी कंपनीला 2.5 बिलियन डॉलर्स दिले होते.

स्पेस एक्स ला काम जमणार नाही असे अनेक एक्स्पर्ट्स ना वाटत होते आणि वेळोवेळी तसे त्यांनी बोलूनही दाखवले होते मात्र एलोन मस्क च्या स्पेस एक्सने सर्व तज्ञांच्या नाकावर टिच्चून बोइंग सारख्या बलाढ्य कंपनीला मागे सारत केवळ अर्ध्या किमतीत यान बनवलं देखील आणि आज मानवाला अवकाशात पाठवणारी पहिली खाजगी कंपनी असा मान मिळविला देखील.

पृथ्वीवर जीवन कठीण होणार आहे आणि त्यावेळेला मनुष्यजातिकडे एक उत्तम पर्याय असला पाहिजे या हेतूने एलोन मस्कने परग्रहावर ये जा करता येईल, प्रवास करता येईल यादृष्टीने स्वस्त रॉकेट बनविण्याचा घाट घातला. जपानचे उद्योगपती यासुकू मेझावा यांनी चंद्रावर फिरायला जाणारा पहिला प्रवासी होण्यासाठी आधीच स्पॅस एक्स कडे जागा नोंदवून ठेवली आहे. हॉलिवूडमधील एक दिग्दर्शक अंतराळात पहिला चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी स्पेस एक्स बरोबर चर्चा करत आहे.
-----------------------------------
मराठी भाषेतून अनेक उपयोगी लेख, विडिओ आणि कोर्सेस पाहण्यासाठी आजच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा - bit.ly/NetbhetApp
-----------------------------------

मित्रांनो पृथ्वीवर असलेली सद्य परिस्थिती बघता एलोन मस्कची दूरदृष्टी खरंच वाखाणण्याजोगी ठरते.

जितका सहज आता विमान प्रवास होतोय येत्या काही वर्षात तीतक्याच सहजरीत्या अंतराळ प्रवास देखील होईल यात काही शंका नाही. जग कसं बदलतंय आणि कुठे चाललंय ह्याचा यावरून नक्कीच आपल्याला अंदाज येईल

आजचे हे अंतराळ उड्डाण स्पेस एक्स च्या वेबसाईटवर लाइव्ह पाहता येईल


मित्रांनो ही एक कहाणी आहे कधीही हार न मानण्याची, ही कहाणी आहे सातत्याची, ही कहाणी आहे प्रचंड मोठे स्वप्न बघण्याची, ही कहाणी आहे एलोन मस्क ची !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !