There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
1889 मध्ये, अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) हा कॅन्सस सिटीमध्ये एक अंत्यसंस्कार करणारा (undertaker) होता.
त्याला मोकळ्या वेळेत नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडायचं. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ असायचा.
याचे करण म्हणजे त्याचा व्यवसाय फारच खराब चालला होता.
त्याला कळेना की असं का होतंय, कारण ५०००० लोकसंख्येच्या शहरात त्याच्याव्यतिरिक्त दुसरा फक्त एकच undertaker होता.
पण सगळेजण दुसऱ्याकडे जात होते, कोणीही स्ट्रॉजरकडे येत नव्हतं.
एकदा त्याने पाहिलं की त्याचा एक मित्रसुद्धा मृत नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या undertaker कडे गेला.
त्याने मित्राला विचारलं, “माझ्याकडे का नाही आलास?”
मित्र म्हणाला की मी फोन केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवर काम करणाऱ्या महिलेने सांगितलं की स्ट्रॉजरचा फोन व्यस्त आहे.
मग तिने कॉल दुसऱ्या undertaker कडे वळवला.
स्ट्रॉजरला हे काही केल्या समजेना. कारण त्याचा फोन कधीच व्यस्त नसायचा. मग त्याने दुसऱ्या मित्राला सांगून एक्सचेंजला फोन करायला लावलं.
पण तो कॉलसुद्धा त्याचप्रमाणे दुसऱ्या undertaker कडे वळवण्यात आला.
थोडी शोधाशोध केल्यावर शेवटी त्याला कळलं की टेलिफोन एक्सचेंजवर जी बाई होती, ती दुसऱ्या undertaker ची पत्नी होती.
ती कायमच स्ट्रॉजरचे कॉल्स आपल्या नवऱ्याकडे वळवत होती!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
त्या काळी फोनवर नंबर डायल करायचे नव्हते.
फोन लावल्यावर थेट टेलिफोन ऑपरेटर कॉल रिसिव्ह करायचा आणि तो हव्या त्या व्यक्तीकडे जोडून द्यायचा.
पण या बाईने मात्र सगळे कॉल आपल्या पतीकडे वळवून टाकले होते.
स्ट्रॉजरला प्रचंड राग आला. त्याच्याजागी आपण असतो तर त्या बाईला खडसावलं असतं, तिची तक्रार केली असती. पण स्ट्रॉजर हा मुळात संशोधक वृत्तीचा माणूस असल्याने त्याने या प्रश्नाकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं.
त्याने ठरवलं की आता अशी यंत्रणा शोधून काढायची की त्या बाईचं कामच संपेल.
त्याने ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज ची कल्पना मांडली.
जिथे कॉल थेट हव्या त्या व्यक्तीकडे जाईल—मध्येमध्ये कोणी कॉल वळवू शकणार नाही.
खूप खटाटोप करून त्याने एक छोटं बेसिक मॉडेल बनवलं. त्याकाळात इलेक्ट्रॉनिक्स स्विचेस नव्हते.
हे पूर्णपणे यांत्रिक (mechanical) असल्याने अनेक भागांना हलावं लागत होतं, त्यामुळे प्रक्रिया थोडी धीमी होती.
यावर उपायही स्ट्रॉजरनेच शोधला. त्याने रोटरी डायल शोधला, ज्यामुळे कॉल आपोआप योग्य नंबरकडे जाऊ शकत होते. त्यावेळी एका रोटरवर 10 कनेक्शन्स बसवता येत, त्यामुळे 10 × 10 = 100 एक्स्टेंशन्स मिळू शकत होते. (रोटरी डायल म्हणजे आपण जुन्या चित्रपटात पाहिलेला प्रत्येक आकड्यासाठी गोल डायल फिरवावा लागणारा फोन !)
1891 मध्ये त्याला पेटंट मिळालं.1892 मध्ये इंडियाना राज्यातील ला पोर्ट (La Porte) शहरात पहिलं ऑटोमॅटिक टेलिफोन एक्सचेंज बसवण्यात आलं.
आणि अगदी खरंच, या शोधामुळे त्या undertaker ची पत्नी आणि बाकी सर्व टेलिफोन ऑपरेटरचं कामच कायमचं संपून गेलं.
स्ट्रॉजरने आपल्या जाहिरातीमध्ये हेच सांगितलं :
“Girl-less. Cuss-less. Out-of-order-less. Wait-less.” (“मुलीशिवाय. शिवीशिवाय. बिघाडाशिवाय. प्रतीक्षेशिवाय.”)
1916 मध्ये त्याचं पेटंट बेल सिस्टिम्स (Bell Systems) ने विकत घेतलं.
पुढे हीच कंपनी Bell Telephone Company झाली आणि नंतर अमेरिकेतील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी AT&T बनली. स्ट्रॉजरने तयार केलेले उपकरण आजही वॉशिंग्टन येथील SPARK म्युझिअममध्ये पाहता येते. आणि त्याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर उपलब्ध आहे.
मित्रांनो, समस्या आली की आपण रागावतो, दोष देतो किंवा हार मानतो. पण खरी वाढ (growth) तेव्हाच होते जेव्हा आपण म्हणतो:
“मी याबद्दल काय वेगळं करू शकतो ? / मी यावरून काय नवीन तयार करू शकतो?”
संकटात लपलेली संधी ओळखणे, त्यावर कृती करणे आणि दीर्घकालीन परिणाम साधणे — हीच खरी प्रगती आहे.
एका अंडरटेकरने व्यावसायिक प्रश्न सोडविण्यासाठी एक संपूर्ण उद्योगक्षेत्रच कायमचं बदलून टाकलं त्याची ही गोष्ट ! कशी वाटली ते कमेंट्स मध्ये अवश्य सांगा !
यशस्वी भव !