"ही" जबरदस्त आयडिया वापरुन "जिओ"ने एअरटेल कडून कमावले करोडो रुपये !


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा "जिओ" लाँच केला होता तेव्हाची गोष्ट.

न भूतो न भविष्यती अशा किंमतीमध्ये रिलायन्सने जिओ च्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. फक्त डेटा साठी पैसे आकारण्यात येत होते आणि कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी बिलकुल पैसे चार्ज केले जात नव्हते. त्यामुळे भारतीयांनी जिओ फोनवर उड्या घेतल्या. आणि कॉल्स फुकट असल्याने प्रत्येकजण भरपूर कॉल्स करायला लागला.

आता झालं असं की भारतामध्ये टेलिकॉम क्षेत्रात एक नियम आहे. ज्या नेटवर्क वरुन दुसर्‍या नेटवर्क वर कॉल केला जात असेल त्या नेटवर्कला "इंटरकनेक्ट चार्जेस" (IUC) देणे भाग असते. या नियमानुसार जिओ वरुन ज्या नेटवर्कला फोन जात होते त्या सर्व नेटवर्क्सना रिलायन्सकडून "इंटरकनेक्ट चार्जेस" द्यावे लागत होते. यामुळे जिओ ला "इंटरकनेक्ट चार्जेस"चा प्रचंड भुर्दंड पडत होता. आधीच ग्राहकांकडून रिलयन्स पैसे घेत नव्हते, आणि त्याचबरोबर हा अधिकचा खर्च रिलायन्सला द्यावा लागत होता. दर तीन महिन्यांत साधारण २५० करोड इतकी रक्कम "इंटरकनेक्ट चार्जेस" म्हणून दिली जात होती.

मित्रांनो, जिओने या अडचणीवर मात करण्यासाठी एक अफलातून कल्पना राबविली.

साधारणपणे कॉल लागल्यानंतर समोरची व्यक्ती कॉल उचलेपर्यंत ४५ सेकंदाचा वेळ दिला जातो. जर ४५ सेकंदात कॉल उचलला नाही तर फोन आपोआप बंद होउन "मिस्ड कॉल" जातो. रिलायन्सने जेव्हा जिओ मधून इतर नेटवर्क्स मध्ये कॉल जायचा तेव्हा ही वेळ ४५ सेकंदांपासून २० सेकंदांपर्यंत कमी केली. त्यामुळे झाले काय की कॉल लवकर कट व्हायचा आणी दुसर्‍या नेटवर्क वरील फोनला मिस्ड कॉल जायचा. आता मिस्ड कॉल आल्याने समोरील व्यक्ती कॉल करायला लागली. साहजिकच "इंटरकनेक्ट चार्जेस" आता इतर नेटवर्क्स कडून जिओ ला मिळायला सुरुवात झाली. जिओ ने आपल्यावर आलेली परिस्थीती इतर नेटवर्क्सवर उलटवली आणि एअरटेल, व्होडाफोन, आयडिया कडून इंटरकनेक्ट चार्जेस कमवायला सुरुवात केली. इतर कंपन्यांना हे लक्षात यायला साधारण दोन वर्षं लागली. तोपर्यंत जिओ ने नियमांतील चोरवाटा शोधून करोडो रुपये कमविले होते.

मित्रांनो, मुकेशभाई अंबांनींची कंपनी कसा विचार करते त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुकेश भाई किती "बेरकी"विचार करतात ते आता तुम्हाला कळले असेलच. परिस्थीती कशीही असो त्यातून मार्ग काढता येतोच ही शिकवणही आपल्याला यातून मिळते.

उद्योजकांनो , या स्टोरी मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई -लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतुन शिकूया , प्रगती करूया !