नकारात्मक लोकांभोवती असताना स्वत:चे विचार कसे जपावे? 

आपल्या मनात येणारे विचार हे आपल्या अवतीभवती असणार्‍या वातावरणावर, लोकांवर अवलंबून असतात आणि त्यामुळे जीवनात सकारात्मकता हवी असेल किंवा एखादे ध्येय गाठायचे असेल तर नेहमी चांगल्या आणि सकारात्मक विचार करणार्‍या लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला आपल्याला नेहमीच मिळतो. परंतु नेहमीच आपल्या अवतीभवती आपल्याला अगदी हवी तशीच माणसं मिळतील असं नाही. कधीकधी आपल्याकडे नकारात्मक विचार करणार्‍या लोकांच्या सानिध्यात राहण्यावचून दूसरा काही पर्यायच उरत नाही, कारण ही माणसं आपली जवळची असतात आपल्या कुटुंबातील, आपले मित्र किंवा मग कामातले सहकारी ज्यांना आपण टाळू शकत नाही.

आपला मेंदू कापसाच्या गोळ्याप्रमाणे असतो आपल्या आजुबाजूला असणार्‍या गोष्टी तो खुप वेगाने शोषून घेतो आणि आपल्या अवचेतन मनामध्ये साठवून ठेवतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा पुराव्याच्या स्वरुपामध्ये आपला मेंदू या माहीतीचा वापर करतो. आणि त्यामुळेच आपले मन आणि त्यामध्ये जाणारे विचार यांवर आपला लक्ष असलाच पाहिजे. कारण अगदी छोटीशी नकारात्मकता आपल्यातील विश्वासावर प्रभाव टाकू शकते.

नकारात्मकता आपल्या आजूबाजूला असताना सकारात्मक राहणे कठीण आहे कारण आपल्या काही लक्षात येण्याच्या आधी नकारात्मक लोकांभोवती असणे आपल्याला नकारात्मक व्यक्ती बनवू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडत असेल आज आपण या लेखामध्ये याच प्रश्नावर उत्तर शेधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

👉 नकारात्मकतेचे रुपांतर संधीमध्ये करा.

नकारात्मक विचार करण्याच्या लोकांना नेहमीच दूसर्‍याच्या आयुष्यावर टिप्पण्या करण्याची सवय असते. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती तुमच्यासमोर असेल तेव्हा तीचे रुपांतर त्यांना चूकीचे सिध्द करण्याच्या संधीत करा. त्यांच्या बोलण्यातून आलेल्या चूकीच्या आणि वाईट गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ नका. त्यांचे विचार आणि बोलणे ते कसे व्यक्ति आहे हे दर्शवतात आपण नाही. लक्षात ठेवा आपल्याबद्दल काय बोलले जाते यावर आपले काहीच नियंत्रण नसते परंतु आपण त्याला प्रतिसाद कसा देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. त्यांच्या नकारात्मक शब्दांमुळे घाबरू नका, त्याऐवजी त्यांना चुकीचे सिद्ध करण्याची संधी म्हणून त्याचा वापर करा.


👉 बोला

नकारात्मक लोक आपल्यातील चांगल्या गोष्टींकडे दूर्लक्ष करतात. आपल्याबद्दल त्यांना काय वाटते हे आपल्याला सांगणे ते महत्त्वाचे समजतात. आणि जेव्हा आपल्याबरोबर हे घडेल तेव्हा ते चूकीचे आहेत हे सांगण्यासाठी प्रामाणिक रहा. त्यांना बाहेर बोलवा आणि याची जाणीव करुन द्या की त्यांनी त्यांची सीमारेषा कशी आणि कुठे ओलांडली आहे. अशा लोकांना दूसर्‍याचा आदर कसा करावा हे सांगण्याचा आणि आक्रमक वर्तन टाळण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे स्वतः स्वतःसाठी बोलणे. आपल्या विचारांचे रक्षण करण्यासाठी आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा शांतपणे बोलत आहोत हे प्रथम सुनिश्चित करा.

👉 आपण ज्या गोष्टींना महत्त्व देता त्या गोष्टींसाठी वेळ द्या.

सर्वात शेवटी, नकारात्मक लोकांमध्ये असताना आपल्या विचारांचे रक्षण करण्यासाठी अशा गोष्टी करण्यामध्ये वेळ घालवा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात आणि आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. कारण याच गोष्टीमध्ये आपला आनंद लपलेला असतो. आणि जितके आनंदी तुम्ही रहाल तितकेच जास्त सकारात्मक रहाल. आपल्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जर तुम्हाला आत्ता माहीत नसेल तर विचारांची जास्त गुंतागुंत न करता फक्त आपल्या मनाला विचारा की कोणत्या गोष्टी तुम्हाला उत्तेजित करतात, आनंद देतात? जेव्हा तुम्हाला या गोष्टी कोणत्या त्या सापडती, तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ त्या गोष्टी करण्यामध्ये घालवा. आणि मग बघा तुमचे मन सकारात्मकतेकडे कसे वळते.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com