जॉन स्टीथ पेंबर्टनने जेव्हा कोका कोला चा शोध लावला तेव्हा ते  55 वर्षांचे होते.

 

रे क्रोक यांनी पेंटर पासून ते ट्रॅव्हलिंग एजन्ट पर्यंत अनेक प्रकाच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी जेव्हा मॅक्डोनल्ड बंधूंकडून फ्रेंचायजी घेतली आणि मॅक्डोनल्ड चा जगभरात कमालीचा विस्तार केला तेव्हा  ते ५९ वर्षांचे होते.


 

कॉलोनेल सँडर्स ने केएफसी ची फ्रेंचायजी त्यांच्या वयाच्या  62 व्या वर्षी घेतली.त्याआधी त्यांनी खूप निरनिराळे व्यवसाय केले.त्यांचे फ्राइड चिकनचे पहिले रेस्टॉरंट फारसे चालले नाही.तरीही ते वेगवेगळे प्रयोग करत राहिले.असे म्हटले जाते कि कॉलोनेल यांनी एक होकार ऐकण्याआधी शंभर नकार पचवले.नंतर त्यांनी केंटुकी फ्राइड चिकन ची फ्रेंचायजी dyayla suruvat keli आणि आज केएफसीचे १७००० पेक्षाही जास्त आउटलेट्स उभे आहेत.

 

टिम आणि नीना झगॅट या दाम्पत्यानी ‘झगॅट गाईड’ नावाचं पुस्तक जे पुढे खुपच लोकप्रिय झालंतेव्हा ते  51 वर्षांचे  होते. 
 

 

चार्ल्स डार्विन ने वयाच्या ५० व्या वर्षी उत्क्रांतीचा सिंद्धांत जगासमोर मांडला .

 

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

ज्युलिया चाइल्ड हिने ५० व्य  वर्षी तीच पाककृतीवरचं पाहिलं पुस्तक लिहिलं.टाइम्स मॅगझीनने तिला फ्रेंच पाककृतीमधला एक महत्तवाचा सांस्कृतिक घटक म्हणून गौरवलं.

 

ओद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या मॉडेल टी कार चा निर्माता हेन्री फोर्ड त्यावेळीस ४५ वर्षांचा होता.त्याला असेम्ब्ली लाइन निर्मिती पद्धतीचा जनक म्हणूनहि ओळखले जाते.फोर्डच्या असेम्ब्ली लाइन पद्धतीमुळे उत्पादन प्रक्रिया सोपी झाल्याने उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत झाली.


 

मायक्रो फायनान्सचे pranete मोहम्मद युनूस यांनी ४३व्य वर्षी ग्रामीण बँकेची स्थापना केली.ग्रामीण बँक स्थापन करण्यामागे प्रामुख्याने गरिबांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे हा आहे.यासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला.

 

सॅम्युएल जॅक्सनचा ‘जंगल फिवर’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला त्यावेळीस तो ४३ वयाचा होता.त्याआधी सॅम्युएल ने खूप स्ट्रगल केले तसेच अनेक नकारहि पचवले होते. 

 

यश हे वयावर कधीच अवलंबून नसतं. पण अपयश मात्र आपण किती लवकर माघार घेतो यावर नक्कीच अवलंबून असत . 
नवीन स्वप्न पाहण्यासाठी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी वयाची बंधने कधीच 
आडवी येत नाहीत. अंतिम ध्येय साध्य करताना तुम्ही किती लहान अथवा मोठे आहेत याने काहीच फरक पडत नाही.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy