वेळेचं नियोजन करण्यासाठी आत्मसात करा ही 5 कौशल्य

जर आपल्याकडे वेळेचं नियोजन करण्याचं कौशल्य असेल तर आपली कामं कधीच मागे पडणार नाहीत. किंबहुना अनेक कामं आपण झपाट्याने हातावेगळी करत जाऊ. मात्र, आपल्यापैकी अनेकांना वेळेचं नियोजन न करता येण्याची समस्या असते. कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना आपला वेळ आणि आपली कामं यांची सांगड घालताच येत नाही. म्हणूनच अशा सगळ्यांसाठी ही 5 कौशल्य, जरूर आत्मसात करा आणि वेळेचं योग्य नियोजन करून कामं पूर्ण करा, यशस्वी व्हा - 

1. दिनक्रम ठरवा - अनेकजण आपला दिनक्रमच नीट ठरवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांकडून आपल्या कामात वेळोवेळी चालढकल केली जात असते. सतत त्यासाठी काही ना काही कारणही ते देत असतात. असं होऊ नये यासाठी आधी तुमचा दिनक्रम दररोज नीट ठरवा. 

2. प्लॅनरचा वापर करा - आपल्या कामाचं आणि वेळेचं नियोजन करण्यासाठी प्लॅनरचा वापर करा. त्यासाठी तुम्ही डिजीटल डायरी, काँप्युटर किंवा नोटपॅड, वगैरे आवर्जून वापरा व प्रत्येक काम आणि त्यासाठी तुम्ही ठरवलेली वेळ यांची योग्य सांगड घालून त्यानुरूपच कामं करत चला. 

3. प्रत्येक कामासाठी डेडलाईन ठरवा - प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी तारीख व वेळेची अंतिम मुदत ठरवा. प्लॅनरमध्ये तशी नोंद करून ठेवा व त्यानुसारच काम करत चला. 

4. इतर व्यवधानांनी विचलीत होऊ नका - आपल्या भवताली घडणाऱ्या दैनंदिन घटनांनी विचलीत होऊ नका. ज्या गोष्टींनी मन विचलीत होत असेल त्या गोष्टींपासून लांब रहा. 

5. महत्त्वाच्या कामांसाठी रिमाईंडर लावा - आपल्याला करावयाच्या कामांसाठी रिमाईंडर लावा. त्यामुळे तुम्ही महत्वाच्या कामांपूर्वी स्वतःला नीट ऑर्गनाईझ ठेऊ शकाल आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण होतील. 

धन्यवाद 

टीम नेटभेट