There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Samsung कंपनीने त्यांच्या 2025 मधल्या स्मार्ट TV साठी नवीन "Vision AI" तंत्रज्ञान जाहीर केलं आहे. यामध्ये "Click to Search" नावाची सुविधा असणार आहे - TV स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर क्लिक केल्यावर त्याबद्दलची माहिती मिळेल, जसं की अभिनेते, ठिकाणं किंवा वस्तू. दुसरी सुविधा आहे "Live Translate" - ही सुविधा परदेशी भाषेतल्या चित्रपटांचे subtitles लगेच मराठीत भाषांतर करून दाखवेल.
Google च्या DeepMind टीमने एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे ज्याला ते "world models" म्हणतात. या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे असं AI तयार करणं जे खऱ्या जगासारखं वातावरण तयार करू शकेल. याचा उपयोग video games, चित्रपट आणि robots च्या training साठी होऊ शकतो.
Jensen Huang यांनी त्यांच्या प्रसिद्ध लेदर जॅकेटमध्ये Project DIGITS नावाचा नवीन सुपर कॉम्प्युटर दाखवला. हा एवढा छोटा आहे की डेस्कटॉपवर बसू शकतो पण त्यावर मोठमोठे AI मॉडेल्स चालवता येतात. या कम्प्युटर च्या मदतीने कोणीही स्वतः chatgpt सारखं AI मॉडेल बनवू शकते.
Qualcomm ने CES 2025 मध्ये नवीन AI तंत्रज्ञान दाखवलं. त्यांनी PC साठी Snapdragon X प्लॅटफॉर्म आणि कार्ससाठी नवीन चिप्स बनवली आहेत. Alpine, Amazon, आणि Sony Honda Mobility सारख्या कंपन्यांबरोबर ते काम करत आहेत.
Stanford आणि Johns Hopkins येथील संशोधकांनी एक नवा प्रयोग केला - त्यांनी रोबोट्सना शस्त्रक्रियांचे व्हिडिओ दाखवून त्यांना स्वतः शिकायला लावलं. रोबोट्स गाठी बांधणं, जखमा साफ करणं अशी कामं करू शकतात आणि चुका झाल्या तर त्या सुधारूही शकतात. पुढच्या दहा वर्षांत अमेरिकेत 20,000 सर्जन्सची कमतरता भासू शकते, तेव्हा हे रोबोट्स मदत करू शकतील.
Sam Altman च्या कंपनीकडे AI एजंट्स नाहीत, जे Anthropic आणि Alphabet कडे आहेत. पण आता त्यांचा एक GPT-वर चालणारा टूल येणार आहे जो इंटरनेट वापरू शकेल. हे काही आठवड्यांतच येऊ शकतं.
आपल्या मनाला सकारात्मक ठेवायचं असेल, emotional strength वाढवायची असेल आणि खरंच आनंदी राहायचं असेल, तर कृतज्ञता हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. जेव्हा आपण एखाद्या कृतज्ञता मार्गदर्शकासोबत (gratitude coach) बोलतो, तेव्हा त्यांची भूमिका असते की आपल्याला एक सुरक्षित आणि supportive वातावरण मिळावं, ज्यामध्ये आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो आणि सकारात्मक राहू शकतो. आता असा मार्गदर्शक तुम्हाला शोधावा लागणार नाही खाली दिलेला prompt तुमची यामध्ये नक्की मदत करेल.
खालील लिंकवर क्लिक करा 🎁 आणि एखादा मजेदार AI एक्सपेरिमेंट व्हिडिओ किंवा AI बद्दल एखादा रंजक लेख किंवा एखादी गुपित टीप मिळवा !
Mystry Link