जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात

एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्‍याने त्याचा गुंरांच्या चार्‍यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेराले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काहीच उगवले नाही. निराश न होता शेतकर्‍याने आपले प्रयत्न चालुच ठेवले. एका मागोमाग एक अशी चार वर्ष गेली तरीही काहीच उगवले नाही. शेतकरी निराश झाला पण त्याने प्रयत्न चालुच ठेवले. शेवटी पाचव्या वर्षी शेतकर्‍याला त्या जागेवर छोटे छोटे कोंब दिसू लागले आणि बघता बघता फक्त ६ महीन्यांच्या कालावधीतच त्या कोंबांचे रुपांतर १०० फूटांच्या घनदाट बांबूंच्या जंगलात झाले. ही बांबूची झाड फक्त ६ महीन्यांमध्ये इतकी उंची गाठू शकली कारण त्यांनी ४ वर्षे घेतली त्यांची मुळे मातीत घट्ट आणि मजबूत रोवण्यासाठी. आपल आयुष्य सुध्दा असच आहे एखादा नवीन अभिनेता एका सुपरहीट चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला असे आपण म्हणतो परंतु असा चित्रपट मिळवण्यासाठी त्यामागे त्याने कित्येक वर्षे घेतलेली मेहनत असते हे विसरुन चालणार नाही. अडचणींमुळे अपयश आले म्हणून वेळ वाया गेला असे समजू नका ह्याच अडचणी तुम्हाला इतके मजबूत बनवतील की तुम्ही काहीतरी साध्य करु शकाल त्यामुळे हार मानू नका प्रयत्न करत रहा.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com