लोकसत्ता आणि नेटभेटच्या संयुक्त विद्यमाने 'कविता मनोमनी' उपक्रमासाठी आवाहन

लोकसत्ता "कविता मनोमनी"

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकसत्ता तर्फे कविता मनोमनी हा उपक्रम आयोजित केला आहे.
यावर्षी साठी सामाजिक आणि राजकीय या विषयांवरील कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसत्ता सोबत या उपक्रमात सहप्रायोजक म्हणून "नेटभेट" देखील समाविष्ट झाली आहे.
मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाची आज सुरुवात होत आहे.

काव्यप्रतिभा सादर करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मराठी भाषिक बांधवांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. सोबत या उपक्रमाबद्दल अधिक माहिती असलेली लोकसत्ता ची कात्रणे जोडत आहे. कृपया ही पोस्ट शेअर करा.


धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !