दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद" - (Part 3 )

आपण भारतीय लोक पैशांची बचत करण्यात नेहमीच हुशार राहिलो आहोत.
पण बँकेत किंवा लॉकरमध्ये पैसे साठवून ठेवणं हे अर्धंच काम आहे.
Compounding चा खरा फायदा मिळवायचा असेल, तर वाचवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवायला हवेत.
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही fixed deposit (FD) मध्ये पैसे ठेवून खूप भारी काम केलं आहे. पण ....

परताव्याचा आभास
समजा तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी नोकरी मिळाली. पण तिथे पगार कमी आहे. तर तुम्ही अशा कंपनीत जॉईन व्हाल का? नाही ना ?
FD मुळे असंच काहीतरी तुमच्या नकळत तुमच्या बाबतीत घडत आहे !

१५ वर्षांपूर्वी FD चे rates खूप चांगले होते, आणि सुरक्षितही होते.
आता rates खूप कमी झाले आहेत; गेल्या काही वर्षांत ते सातत्याने घटत गेले आहेत.
एकच गोष्ट कायम आहे - FD rates महागाईवर जेमतेम मात करू शकतात!
परिणामी, तुमची संपत्ती खरंतर कमी होत आहे कारण महागाई तुमचा नफा खाऊन टाकते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
हे कसं ते समजून घेऊया.
महागाई (Inflation) म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये होणारी सर्वसाधारण वाढ.
एक लिटर दुधाची किंमत दहा वर्षांपूर्वी २ ५ रुपये लिटर होती आज तीच किंमत ५ ६ रुपये प्रती लिटर आहे.
साध्या भाषेत सांगायचं तर, महागाईमुळे पैशांची खरेदी क्षमता कमी होते.

आणखी एक उदाहरण: पाहूया. समजा २००१ मध्ये तुम्ही १ लाख रुपये कपाटात ठेवून दिले असते आणि २०२४ मध्ये काढले असते तर त्याची किंमत आज २ ४ ० ० ० इतकीच राहिलीच असती. भविष्यात ही महागाई १ लाख रुपयांची किंमत आणखी कमी करत राहील.

आता परत FD कडे येऊया. गेल्या २० वर्षांत FD चे rates भारतातल्या सरासरी महागाईच्या दर (६-७%) च्या जेमतेम बरोबरीचे राहिले आहेत, त्यामुळे FD मधून कुणीही श्रीमंत झालेलं नाही.
तुलना करायची तर, FD मध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्या आवडीच्या कंपनी मध्ये कमी पगारावर जाण्यासारखंच आहे.

*मग गुंतवणूकदारासाठी सर्वोत्तम पर्याय काय?*
आपल्याला fixed income investments च्या सुरक्षित परताव्याच्या comfort zone बाहेर पडून equity म्हणजेच shares मध्ये गुंतवणूक करायला हवी.
तुम्हाला कदाचित वाटत असेल की शेअरबाजार हा सट्टा आहे. पण लक्षात घ्या ...दीर्घकाळात equity ने महागाईपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
होय, equity ने सोन्यालाही मागे टाकलं आहे!
आठवतंय २००१ मधल्या कपाटातल्या १ लाख रुपयांचं काय झालं ते?

Equity मध्ये गुंतवणूक केल्यास उलटा परिणाम होतो. तेवढेच पैसे Sensex मध्ये (भारतातल्या ३० मोठ्या कंपन्यांचे shares) गुंतवले असते, तर २०२३ च्या अखेरीस ते २१ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते!

ऐकायला छान वाटतंय, पण धोका आहे त्याचं काय? Equity मध्ये गुंतवलेले पैसे बुडू पण शकतात.
खरं आहे, अल्पकाळात equity खूप अस्थिर असू शकते.
पण पाच वर्षं किंवा त्याहून जास्त कालावधीत हा धोका बराच कमी होतो.

आकडेवारी स्पष्टपणे सांगते की दीर्घकाळात तुम्हाला कुठल्याही fixed income पर्यायापेक्षा Equity मध्ये जास्त परतावा मिळेल.
पुढच्या १०-२० वर्षांत भारताचा विकास होणार आहे. भारतीय कंपन्या मोठ्या होणार आहेत यावर तुमचा विश्वास असेल, तर तुमचा शेअर्स मधील गुंतवणुकीवरील विश्वास आणखी वाढायला हवा. भारत जितका जलद विकास करेल, तितकं भारतीय share market साठी चांगलं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================

*Equity मध्ये गुंतवणूक कशी करायची ?*
यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत:
१. थेट shares मध्ये गुंतवणूक
२. Mutual funds

अंतिम उद्दिष्ट एकच असलं तरी दोन्ही पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत.

थेट shares ची गुंतवणूक अनुभवी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे मार्केटचा मागोवा घेतात, कंपनीचा व्यवसाय समजून घेतात आणि स्वतः योग्य shares शोधतात.
याउलट, mutual funds खूप सोपे आहेत. सोपे यासाठी की तुम्हाला shares निवडण्याची जबाबदारी आणि दबाव नसतो; तुम्ही एका professional fund manager ला हे काम करू देता.
म्हणूनच mutual funds नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत, ज्यांना market चा मागोवा घ्यायला आणि मोठमोठे business reports वाचायला वेळ नाही. त्यांच्यासाठी तर Mutual Funds एक वरदान आहे.

PART 1 LINK - https://learn.netbhet.com/blog/-power-of-long-term-investing-part-1

PART 2 LINK - https://learn.netbhet.com/blog/-the-power-of-long-term-investments-part-2


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com