यशाचा फॉर्म्युला

यशाचा फॉर्म्युला .....
मित्रानो यश मिळविणे सोपे नाही. मात्र यशाचा प्रवास खडतर असला तरी आनंद देणारा आहे. यशस्वी होण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला नक्की आवडेल.
आवडला तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेर करायला विसरू नका !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया

1. काही चुका टाळता येतात त्या टाळल्यानंतर, आणि काही चुका झाल्यानंतर त्या टाळायला हव्या होत्या असं वाटतं... अशा सर्व चुका करून झाल्यानंतर जो उरतो तो अनुभव !

2. अशा कितीही चुका झाल्या तरी त्या सुधारून पुढे जायची तयारी म्हणजे आत्मविश्वास 

3. या सगळ्या चुका घडत असताना विचलीत न होण्याची क्षमता तयार होते ती म्हणजे आत्मभान

4. त्याच चुका पुन्हा पुन्हा न करण्याची जी समज येते ती म्हणजे शहाणपण

5. आपल्या चुकांची पूर्ण जबाबदारी घेतली आणि इतरांच्या चुकांमुळे कडवटपणा येऊ दिला नाही तर मिळतो आनंद

6. अनुभव + आत्मविश्वास + आत्मभान + शहाणपण + आनंद = यश