मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी गुंतवणुकीचे प्रमुख नियम !

आपल्याला आवडो अथवा न आवडो, पैसा ही माणसाच्या जिवनातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हे मान्य करायलाच पाहिजे. या पैशाच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी आज आपण या लेखात पाहणार आहोत. आपण कमवत असलेला पैसा आपण कसा खर्च करतो? कसा केला पाहिजे ? आणि भविष्यासाठीची पैशांची
गुंतवणूक करणे का महत्त्वाचे आहे ? गुंतवणूक करताना नेमकं काय केले पाहिजे ?या काही प्रश्नांची चर्चा आपण आता करूया. गुंतवणूक करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना अनुभव, वेळ याची गरज भासत नाही.फक्त तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नवीन गुंतवणूकदारांना तर याचा नक्कीच फायदा होईल.

👉 दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा:
गुंतवणुकीमधून श्रीमंत व्हायचे असेल तर तीन गोष्टी आवश्यक असतात. आकर्षक व्याज/परताव्याचा दर, मुद्दल आणि वेळ. यापैकी परताव्याचा दर जेवढा जास्त तेवढी रिस्क वाढते म्हणून एका पातळीपर्यंतच आपण व्याज/परताव्याचा दर वाढवू शकतो. मुद्दल किंवा गुंतवणुकीची रक्कम जास्तीत जास्त असली पाहिजे पण दैनंदिन वाढत्या खर्चामुळे जास्त रक्कम गुंतवणे सहज शक्य नाही. आता उरली तिसरी गोष्ट टी म्हणजे वेळ. गुंतवणुकीला वाढीसाठी वेळ आपण दिला पाहिजे. म्हणूनच अगदी तरुण पणीच पहिल्या कमाईपासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे आणि टी दीर्घकाळ पर्यंत करत राहिली पाहिजे. याव्यतिरिक्त, दीर्घकाळासाठी आपण केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकीतील केलेल्या चूका सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल.

===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================

👉 आपली आर्थिक उद्दिष्टे विशिष्ट गुंतवणूकींशी जोडा:
आपली आर्थिक उद्दिष्ट काय असली पाहिजेत हे ठरवून मगच गुंतवणूक कशी करता येईल आणि आर्थिक उद्दिष्ट व गुंतवणूक यांना एकमेकांशी कसे जोडून ठेवता येईल हे अभ्यासा. वर सांगितल्या नुसार दीर्घकालीन गुंतवणूकीस प्राधान्य देणे फायद्याचे ठरेल. कारण यामुळे आपल्याकडे पैशाच्या साठवणूकीसाठी अधिक वेळ मिळतो. उदाहरणार्थ: सेवानिवृत्ती आणि संपत्ती निर्माण करणे ही उद्दीष्टे दीर्घकालीन असतात, म्हणून त्यांना इक्विटी म्युच्युअल फंडाशी जोडणे फलदायी ठरेल. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना अस्थिरतेला कमी करण्यासाठी एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम) या मार्गाने गुंतवणूक करता येऊ शकते. असे करताना लहान रक्कमेतून सुरू करा आणि जेव्हा आपल्याकडे जास्त रक्कम असेल तेव्हा हळू वाढवत जा.

👉 आरोग्यविम्यासह स्मार्ट व्हा :
स्वतः साठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगला आरोग्य विमा घ्या. भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कधी निर्माण होईल आपण कधीच सांगू शकत नाही. हे खर्च अचानकपणे निर्माण होतात आणि आपली आर्थिक गणित योग्य नसतील तर फार त्रासदायक ठरू शकतात.

👉 आपली बचत स्वयंचलितरित्या करा:
पैशासंबंधित स्वयंचलिता करणे (ऑटोमॅटिंग) हे पैशांची बचत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये उदारणार्थ,
आपण आपल्या बँकेत दरमहा आपोआप आपल्या बचत खात्यात एक छोटी रक्कम आपोआप पाठवू शकता. यामध्ये होते काय ? तर आपण जतन करू इच्छित असणारे पैसे एका विशिष्ट कालावधीमध्ये आपोआप स्वतंत्रपणे वेगळे केले जातात. त्यामुळे स्वयंचलित बचत करणे ही एक चांगली गुंतवणूक बनवू शकते. ऑटोमॅटिक केल्यामुळे बचतीशी कोणत्याही भावना जोडल्या जात नाहीत.

👉 गुंतवणूक आणि विमा एकत्र मिसळू नका:
गुंतवणूक आणि विमा हे दोन्ही शब्द समानार्थी अजिबात नाहीत हे लक्षात घ्या. गुंतवणूक व विमा यांची उद्दिष्टे वेगळी असतात आणि त्यातून मिळणारे फायदे ही वेगळे असतात. विमा हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा आपत्कालीन घटनांपासून संरक्षण व्हावे या साठी काढला जातो. संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केली जाते. आर्थिक नियोजनात विमा आणि गुंतवणूक दोन्हीचा सहभाग असावा परंतु कारणे नक्कीच वेगळी असणार आहेत. गुणतवणुकीसाठी विमा आणि विम्यासाठी गुंतवणूक कधीच करू नका. जास्त परतावा देणारा विमा नको तर जास्त कव्हर देणारा विमा पाहिजे.

===================
आर्थिक स्वातंत्र्यासाठी गुंतवणूकीचे विविध मार्ग आपल्यासमोर मांडणारा ऑनलाईन कोर्स आर्थिक नियोजन - गुंतवणुकीतून श्रीमंतीचा मार्ग (Personal Finance Expert) अधिक माहीतीसाठी खालील लिंक ला भेट द्या.
http://bit.ly/PFE111
===================

👉 विविधता महत्वाची आहे :-
कधीच एका ताटात आपण सगळे पदार्थ मिक्स करून खात नाही तोच नियम आपण गुंतवणूकित वापरणे महत्वाचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणारे पर्याय काय आहेत तपासून पहा. उदा. ( Equity / Debt / Bonds / Deposits/ Liquid funds / Real Estate / Gold ) अश्या वेगवेगळ्या ठिकाणी थोडे गुंतवून ठेवण्याचा विचार करा. आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत या वर किती गुंतवुन करायची ते ठरवा.

👉 संपत्ती निर्माण करण्याबरोबर कर नियोजनाची सोय करणे:
कर-बचत फायद्याचा लाभ घेण्यासाठी लोक बर्‍याचदा चांगल्या परतावा न देणाऱ्या गुंतवणूकीकडे आकर्षित होतात. या दोघांमध्ये फरक करणे आवश्यक आहे आणि ती दोन वेगवेगळी ध्येये आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि या दोन्ही मध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

👉 कर्ज टाळा :
तुमच्याकडे पैसा असला तरीही क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयद्वारे एखादी वस्तू खरेदी करणे ही चांगली सवय नाही आणि यामुळे अनावश्यक खर्चाची निर्मिती होत जाते. जोपर्यंत कर्ज उपलब्ध होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या होणाऱ्या खर्चाची तपासणी करत नाही आणि आपण आपल्याला आवश्यक नसलेल्या वस्तू विकत घेतो आणि कर्जाच्या ढिगात भर घालत असतो. हे नंतर आर्थिक ओझे बनू शकते आणि आपण गुंतवणूकीसाठी मुक्त असलेल्या पैशांवर मर्यादा घालणारे ठरू शकते. आणि गृहकर्जासारखे मोठे कर्ज घेतले असेलच तर शक्य तितक्या लवकर कर्ज फेडण्याकडे लक्ष द्या.

👉 आपल्या आर्थिक पोर्टफोलिओचा वेळोवेळी रिव्ह्यू करणे सुरू करा:
नियमित वेळेनंतर आपल्या पोर्टफोलिओचे (एकूण गुंतवणूक) मूल्यांकन करणे फार महत्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की आपण दररोज हे तपासावे. दर सहा महिन्यांनी किंवा दर वर्षी एकदा त्यावर नजर फिरवली पाहिजे. जसजसे उत्पन्न वाढेल तसे आपण पोर्टफोलिओ मध्ये बदल करू शकतो'. प्राधान्याने करण्याच्या गोष्टी बदलत जाऊ शकतात. त्यामुळे हे अंत्यत आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये विविधता आणायची असेल , गुंतवणूक वाढवायची असल्यास फायदेशीर ठरते.


धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
Learn.netbhet.com