उबंटू…

उबंटू  हि आफ्रिकेतील एक छानशी गोष्ट आहे... 
उबंटू हि संस्कृती आहे..एक प्रेरणा आहे... 

एकदा आफ्रिकेमध्ये संशोधन करीत असलेल्या मानववंश शास्त्रज्ञाने तिथल्या आदिवासी मुलांसोबत एक गंमत करायचे ठरवले. 

त्याने एक खाऊचा डब्बा एका झाडाजवळ ठेवला आणि सर्व मुलांना तेथून दूर १०० मीटर अंतरावर उभे राहण्यास सांगितले. 

मग मुलांना असं सांगितलं कि मी इशारा केल्यानंतर जो कोणी सर्वात प्रथम त्या डब्याजवळ पोहोचेल त्याला बक्षीस म्हणून तो सर्व खाऊ मिळेल.

त्या मुलांनी काय बरं केलं असेल?
सर्व मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि इशारा झाल्यावर सर्व एकत्र त्या खाऊच्या डब्याजवळ पोहोचले. सगळा खाऊ एकमेकांमध्ये सामान वाटून आनंदाने,एकत्रितपणे खाल्ला.

त्या शास्त्रज्ञाला आश्चर्य वाटले,त्याने मुलांना असे का केले असं विचारल्याबरोबर त्या मुलांनी त्याला उत्तर दिले,

“उबंटू’’....

याचा अर्थ असा होता, कि जर इतर सगळे व्यथित असतील तर कोणी एक जण आनंदी नाही राहू शकत.त्यांच्या भाषेत उबंटू म्हणजे “मी” आहे कारण “आम्ही आहोत”!!

एकाच शब्दात आयुष्याच्या आनंदाची किल्ली जी आज सर्वांसाठी लागू होईल.आपण सर्वानीच आणि आपल्यासोबत इतरांनीही यातुन प्रेरणा घेऊन असच सकारात्मकपणे
“उबंटू” आयुष्य जगण्याची...अनुभवण्याची गरज आहे.

म्हणूनच ‘उबंटू’ हि संस्कृती सर्वांनीच जोपासुया,“मी” आहे कारण “आम्ही” आहोत!

 ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाटसप वर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com