Unsplash.com वर मिळवा कॉपीराईट फ्री इमेजेस 

#Web_Wednesday

फ्री इमेजेस आणि फोटोजसाठी इंटरनेटवर असंख्य वेबसाईट्स आहेत. त्यापैकी आणखी एक लक्षवेधी वेबसाईट म्हणजे Unsplash.com
तुमच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी जर तुम्हाला कॉपीराईट फ्री इमेज हव्या असतील तर तुम्ही या वेबसाईटवर विषयांनुरूप फोटोज डाऊनलोड करू शकता आणि ते ही अगदी मोफत.

या वेबसाईटवर हाय रिझोल्यूशनचे तब्बल 1.3 मिलीअन एवढे फोटोज आहेत. त्याचबरोबर दरमहा या वेबसाईटवर सुमारे 65 हजार नवीन फोटोज, इमेजेस जगभरातील काँट्रीब्यूटर्सकडून अपलोड केले जात असतात.
वॉलपेपर्स, टेक्स्चर्स आणि पॅटर्न्स, पीपल, हेल्थ, एक्स्पेरिमेंटल, फूड अँड ड्रींक, फॅशन, फिल्म, बिझनेस, आर्कीटेक्चर, नेचर अशा नानाविध विषयांवर या वेबसाईटवर फोटोज अव्हेलेबल आहेत.
कलेक्शन्स सेगमेंटमध्ये थीम, मूड, कलर्स आणि टेक्स्चर्स या अंतर्गत येणारे फोटोजचे वर्गीकरण केलेले आहे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

UN आणि Unsplash.com यांचे कोलॅबोरेशन -
मे 2020 पासून युनायटेड नेशन्स आणि अनस्प्लॅश यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन व्हिज्युअल्स पब्लिक सर्व्हीस अनाऊन्समेंट सिस्टम फॉर दी इंटरनेटची सुरुवात झाली.
कोव्हीड 19 च्या काळात जगभरातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी युएनने एक खुले पत्र प्रसिद्ध केले होते. यात असे म्हटले होते की,
“We are in an unprecedented situation and the normal rules no longer apply. We cannot resort to the usual tools in such unusual times. The creativity of the responses must match the unique nature of this crisis — the magnitude of the responses must match its scale.” – UN Secretary General, António Guterres

या पत्राला जगभरातील अनेक फोटोग्राफर्सनी प्रतिसाद देत अनस्प्लॅश डॉट कॉमवर तब्बल 17 हजार फोटोज, इमेजेस सबमिट झाले. त्यानंतर अन्स्प्लॅशने व्हिज्युअल पब्लिक सर्व्हीस अनाऊन्समेंट सिस्टीम फॉर द युएन असा बदल स्वतःत केला. Unsplash.com/@unitednations या ट्विटर हँडलची निर्मितीही करण्यात आली.

अनस्प्लॅश आणि झूमची पार्टनरशिप -
या पार्टनरशिपमुळे झूमच्या व्हिडीओ कॉलमध्ये तुम्हाला अनस्प्लॅशच्या फोटोंची बॅकग्राऊंड मिळते. ही व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरून तुमच्या व्हिडीओ कॉलला तुम्हाला अधिक रंजक बनवता येते.

झूम कॉलमध्ये व्हर्च्युअल बॅकग्राऊंड कशी वापरायची त्याच्या स्टेप्स याप्रमाणे -
1. झूम मिटींग टूलबारमधील Apps icon वर क्लिक करा.
2. आता त्यामध्ये Virtual backgrounds पर्यायावर क्लिक करा.
3. अनस्प्लॅश डॉट कॉम वर सर्च करण्याचा पर्याय मिळेपर्यंत स्क्रोल करा.
4. आता त्यापैकी तुम्हाला हवी ती इमेज, फोटो सर्च करा आणि जी इमेज हवी त्यावर क्लिक करा.
5. तुमच्या घरातला पसारा लपवण्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्याच जागी आहात असे भासवण्यासाठी या अशा व्हर्च्युअल बॅकग्राऊंड्स ऐन घाईगर्दीच्या, धावपळीच्या वेळी खूप कामाच्या असतात बरं का ...!

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया