There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
दोन दिवसांपूर्वीच मी एक लेख फेसबुकवर प्रकाशित केला होता. "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !" या विषयावरील लेख होता. बहुतेकवेळा आपलं मत तयार करण्यासाठी चित्रपट / सोशल मीडिया / इतर माध्यमे कन्टेन्ट तयार करत असतात.
काही विशिष्ट प्रकारचे कन्टेन्ट मानवी भावना उद्युक्त करते. चर्चा करण्यास , व्यक्त होण्यास भाग पाडते हे अल्गोरिदमला माहित आहे. आणि जे लोक या अल्गोरिदमला जाणतात ते अशा प्रकारचे कन्टेन्ट तयार करतात. आपल्याला वाटतंय की जे घडलं त्यावर मी व्यक्त झालो. पण प्रत्यक्षात आपण व्यक्त व्हावं म्हणून गोष्टी घडवल्या जातात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
याचच एक उदाहरण म्हणजे काळ झालेल्या गुकेश विरुद्ध हिकारू बुद्धीबळ सामन्यातील घटना. हिकारूने सामना जिंकल्यानंतर गुकेशचा "राजा" उचलून प्रेक्षकांत भिरकावला. त्यावरून कालपासून सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. हिकारू उद्धट आहे, गुकेश संयमी आहे आणि भारतीयांविरुद्ध असा राग का व्यक्त केला जातोय ? ही बुद्धीबळ संस्कृती नाही. अशा अनेक चर्चा घडतायत.
ज्यांना या सामन्याबद्दल काहीही माहिती नसेल त्यांना पण ही घटना लक्षात राहिली. इतकी तिची चर्चा झाली. पण मी वर सांगितल्याप्रमाणे आपण घडलेल्या घटनेवर व्यक्त झालेलो नसून आपण व्यक्त व्हावे म्हणून हे घडवून आणण्यात आले होते. Any publicity is good publicity या तत्वानुसार ही Viral घटना मुद्दामहून घडवण्यात आली होती. जिंकल्यावर काहीतरी वेगळे सेलिब्रेशन करा, जेणेकरून प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारेल असे खेळाडूंना सांगण्यात आले होते. यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या सर्व सोंगट्या उधळणे, राजा मोडून त्याचे दोन तुकडे करणे किंवा राजा प्रेक्षकात भिरकावून देणे अशा काही कल्पना देण्यात आल्या होत्या.
मागे गुकेशबरोबर हरल्यानंतर मॅग्नस कार्लसनने टेबलवर जोरात हात आपटला होता. ती ठरवून दिलेली प्रतिक्रिया नव्हती पण ती Viral झाली. त्यावर चर्चा झाली , मिम्स बनले, रील्स बनल्या. त्याच घटनेकडून प्रेरणा घेऊन चेस सामन्यांच्या मालिकेला वलय मिळवून देण्यासाठी यावेळी Viral घटना तयार करण्यात आली. ....आणि लोक चर्चा करू लागले...मार्केटिंग टीमची कल्पना यशस्वी झाली....अल्गोरिदमने बाकीचे काम पूर्ण केले !
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !