करिअरची सुरुवात करताना... #Friday_Funda

आपला पहिला जॉब खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला पहिला जॉब मनासारखा असतोच असे नाही.

पण तरीही पुढे आपलं करिअर कोणत्या दिशेने जाणार हे ठरविण्यासाठी पहिला जॉब महत्वाचा ठरतो.

म्हणूनच एकदा जॉब मिळाला की -
✔️ खूप मेहनत करा
✔️ भरपूर शिकायचा प्रयत्न करा
✔️ वेगवेगळ्या पातळ्यांवरील/वेगवेगळ्या वयाच्या लोकांसोबत मिसळायला शिका
✔️ तक्रार करू नका
✔️ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची Reputation तयार करा आणि टिकवा

तुम्ही विश्वासपात्र आणि प्रामाणिक आहात हे जेव्हा इतरांना पटेल तेव्हाच ते तुमच्यात गुंतवणूक करतील.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

बॉसेस तुम्हाला प्रमोशन देण्यासाठी त्यांच्या बॉसकडे शब्द टाकतील. सहकारी तुम्हीच एखाद्या प्रोजेक्ट मध्ये हवेत म्हणून मागणी करतील.
वरिष्ठ तुम्हाला काम शिकवतील, सहकारी मदत करतील आणि पुढे येणारे नवे लोक तुम्हाला फॉलो करतील.

हे करणं जर जमलं तर पुढे कोणत्याही कंपनीत, कोणत्याही विभागात, कोणत्याही पदावर काम करणे तुम्हाला सहज शक्य होईल.

आपली सुरुवात कुठे झाली यावरून आपण कुठे पोचणार हे ठरत नसते. तर आपण सुरुवात कशी केली यावरून मात्र आपण कुठे पोहोचणार हे ठरत असते.

आणि हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.

#careeradvice #worklife #promotion #corporatelife #successformula


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com