ज्याची त्याची श्रीमंती!

सुर्यपूर नगरात दोन बालमित्र राहत होते — सोमेश आणि योगेश. लहानपणी एकत्र खेळत मोठे झाले, पण आयुष्याच्या वळणावर एके दिवशी ते दोघे वेगवेगळ्या वाटांनी निघाले.
सोमेश अभ्यासात हुशार होता. त्याने शिक्षण घेतलं आणि शेवटी सुर्यपूरच्या राजदरबारी मंत्री म्हणून नेमणूक झाली. मात्र सुर्यपूरचा राजा हा लहरी स्वभावाचा होता. रोज त्याच्या मर्जीचे वेगवेगळे फतवे, अनपेक्षित राग आणि तुटक बोलण्याला सामोरी जावं लगे. या सगळ्यातही सोमेशने आपली हुशारी, संयम आणि राजनिष्ठा वापरून स्वतःचं मंत्रीपद टिकवलं होतं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
दुसरा मित्र, योगेश, वेगळ्या वाटेवर गेला. तो घरदार सोडून साधू झाला. दिवसभर ध्यानधारणा करायचा, गावोगावी फिरायचा, आणि जेवायला मिळेल ती भिक्षा घेऊन दिवस ढकलायचा. त्याचं कोणतं घर नव्हतं, कोणतं निश्चित स्थळ नव्हतं.

अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे आयुष्य जगत जगत वीस वर्षं उलटली. एके दिवशी अचानक ते दोघे एका मेळाव्यात भेटले. दोघांच्याही डोळ्यात आठवणींची भरून आल्या. जुन्या गोष्टी, बालपणीच्या खोड्या... सगळं काही आठवलं.
हळूहळू आजच्या परिस्थितीकडे चर्चा वळली. सोमेश म्हणाला,
"योगेश, आता तरी माझ्यासोबत चल. इतकी वर्षं भटकून भिक्षा मागणं, चटणी-भाकरीवर दिवस ढकलणं… किती दिवस करणार? माझ्याकडे ये. तुला राजदरबारात एखादं काम मिळवून देईन. शिकशील, स्थिरतेने जगशील."
योगेश हसत म्हणाला,
"सोमेश, तुला मी एक विचारू का? तूच का नाहीस येत माझ्यासोबत? एकदा चटणी-भाकरी खाऊन पोट कसं भरायचं ते शिकलास, की तुला कोणाची मर्जी सांभाळत जगावं लागणार नाही. प्रत्येक वेळी बोलताना राजा खूश होईल की रागावेल ?— याचा विचारही करावा लागणार नाही."

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
क्षणभर दोघं शांत झाले. दोघांच्याही डोळ्यात आपल्या मार्गावर असलेली खरी श्रीमंती चमकून गेली.
कोण श्रीमंत? कोण गरीब? ज्याने त्याने ठरवावं !

✍️ सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !