There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्याला असं वाटतं की वयाची पंचवीशी ओलांडली की आपण आपल्यावरील जबाबदाऱ्या पार पाडण्याला अधिक महत्व दिलं पाहिजे भले मग त्यासाठी आपली स्वप्न पणास लागली तरीही चालेल.. हे असंच आपल्या मनावर वर्षानुवर्ष बिंबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शक्य असूनही बरेचजण आपल्या स्वप्नांपेक्षा आपल्या कर्तव्यपूर्तीला महत्त्व देतात आणि पुढे संपूर्ण आयुष्य आपण आपलं स्वप्न पूरं करू शकलो नाही या दुःखात कुढत कुढत आयुष्य जगतात.
पण, केवळ वयाच्या विशिष्ट टप्यातच नव्हे, तर माणसाने जेव्हा पक्कं ठरवलं तेव्हाही तो त्याची स्वप्न पूरी करू शकतो. मात्र त्यासाठी त्याचा निर्धार पक्का हवा, दिशा ठरलेली हवी आणि लक्ष्य अचल हवं.
वयाच्या बावीशीतच तुम्हाला एखाद्या कंपनीचा सीईओ बनण्याची गरज नाहीये. या वयात तुम्ही स्वतःला आझमावून बघू शकता. निरनिराळ्या करिअरच्या वाटा तर नक्कीच चोखाळू शकता. खरंतर तुमच्या आवडीचं काम करायला तुम्हाला कोणत्याही वयाची मर्यादा नाहीये. तुम्ही कोणत्याही वयात तुमचं करिअर स्विच करू शकता आणि नवं काहीतरी ट्राय करून पाहू शकता. जीवनाची अशी काही टाईमलाईन नसते. प्रत्येकाचं आयुष्य इतरांपेक्षा निराळं असतं. किंबहुना एकाच वेळी सगळं काही करणं हे आपल्यासाठी अशक्य आहे. म्हणूनच वयाच्या विळख्यात अडकूच नका. तुमचं आयुष्य तुम्ही कोणत्याही वळणावर सुरू करू शकता. तुम्हाला हवं ते करण्यासाठी, तुमच्या आवडीचं काहीही करण्यासाठी जीवनातला प्रत्येक दिवस तुमच्यासमोर बाहू पसरून उभा आहे. तुमची सुरूवात तुम्ही वयाच्या कोणत्या टप्प्यावर केलीत आणि तुमचा अनुभव कसा होता आम्हाला जरूर कळवा..