नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स

access_time 2019-12-28T11:59:32.787Z face Team Netbhet BusinessStart upEntrepreneurship

नमस्कार मित्रांनो,

या लेखामध्ये आपण काही नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स पाहणार आहोत. सध्या इंटरनेट, मोबाईल, टेकनॉलॉजि यांची खूप प्रगती होत आहे आणि या सगळ्यामुळे अनेक इंनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स तयार झाले आहेत. खूप साऱ्या उद्योजकांनी याचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे. आणि नवनवीन स्टार्टअप्स चालू केले आहेत. आणि त्यापैकीच काही मोठे बिझनेस देखील बनले आहेत.
तुम्ही हे नवीन बिझनेस मॉडेल्स वापरून तुमचा बिझनेस  चालु करु शकता किंवा ग्राहकांचा एखादा प्रश्न सोडवून त्याच्यातून एक नवा आणि मोठा बिझनेस उभारू शकता. चला तर मग आता आपण ओळख करून घेऊयात या नव्या बिझनेस मॉडेल्सची.

ऑन डिमांड बिझनेस मॉडेल : (On  Demand Business Model )
यामध्ये नावाप्रमाणेच आपल्याला हवे तेव्हा किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा प्रॉडक्ट किंवा सेवा

सध्या वेळ हा खूप महत्वाचा घटक आहे आणि जिथे जिथे वेळ वाचवणे शक्य आहे तिथे लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळेच ऑन डिमांड बिझनेस मॉडेल्स चालत आहे. ऑन डिमांड बिझनेस मॉडेल्स ची खूप सारी उदाहरणे आहेत. सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे उबर किंवा ओलाच. ऑन डिमांड आपल्याला पाहिजे तेव्हा आपण अँप मधून बुक केलं की गाडी आपल्यासमोर हजर होते. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपल्या समोर येते. हे झालं ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. या बिझनेस मॉडेलमद्ये खूप सारे स्टार्टअप आहेत. आणि त्या खूप जोमाने वाढत देखील आहेत.

२.  शेअरिंग इकॉनॉमी  :
शेअरिंग इकॉनॉमी म्हणजे वस्तू किंवा गोष्टी आपापसात वाटून घेतल्या जातात.  राईड शेअरिंग म्हणजे तुम्ही ऑफिसला जातायेता रस्त्याने जाणाऱ्या माणसांना तुमच्या गाडीत घेऊन जाऊ शकता आणि त्याचे पैसे आकारू शकता. हे यापूर्वी देखील शक्य होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य नव्हतं. परंतु आता मोबाईल फोनमुळे तुम्ही कुठेही ARBN ची रूम बुक करू शकता. भारतात देखील खूप साऱ्या सर्विसेस आहेत जुगनू, लीफटो  आहे ज्या राईड शेअरिंग मध्ये आहेत. जुगनू ऑटोरिक्षाच शेअरिंग करत. त्याच्यामुळे तुम्ही हे जुगनू अँप वापरून रिक्षा इतर व्यक्तींसोबत शेअर करू शकता.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

३. अग्रीगेटर बिझनेस मॉडेल  :
हे बिझनेस मॉडेल सध्या खूप चालतंय आणि त्यांनी त्याची ग्रोथ हि खूप जलद होतं आहे.  याच एक उदाहरण म्हणजे वयोरुम्स. कदाचित तुम्ही हे देखील नाव ऐकलं असेल. ओयोरुम्स हे भारतातील सगळ्यात मोठं हॉटेल चैन आहे परंतु त्यांची स्वतःची एकही हॉटेल नाही. रितेश अग्रवाल या २१ वर्षीय मुलाने सुरु केलेलं हे स्टार्टअप आज भारतातील सगळयात मोठी हॉटेल चैन आहे. ओयो रूम ने अग्रीगेटर बिझनेस मॉडेल वापरलं आहे. म्हणजेच हे ओयोरुम्स वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत टायप्स करत आणि त्यांना ग्राहक आणून द्यायचं काम करत. त्याच प्रोसेसमध्ये त्यांनी सगळ्या हॉटेल्सला स्टॅंडर्ड केलेलं आहे. ते स्टॅंडर्ड म्हणजे ओयोरुम्स चे ब्रँड आणि प्रोसेस असणार. हॉटेलचे मॅनेजमेंट, रिसेप्शन, बुकिंग कसे असावे हे देखील तेच बघणार. अश्याच इतर गोष्टी देखील ठरवून दिलेल्या आहेत. भारतात कुठेही रूम बुक केली तरी एकसमान अनुभव मिळावा किंवा सामान दर्जाची सर्विस मिळावी. आणि यालाच अग्रीगेटर मॉडेल असे म्हणतात. त्याचप्रमाणे झोस्टलने हॉस्टेल ची सर्विसेस दिलेली आहे. विविध ठिकाणच्या होस्टेल्सला त्यांनी एकत्र केलं, त्यांचं ब्रॅण्डिंग, प्रोसेस स्टॅंडर्ड केल्या आणि मग एका अँपद्वारे त्यांनी त्यांना ग्राहक द्यायला सुरुवात केली.

४. फ्रीमीयम बिझनेस मॉडेल . :
फ्रीमियम बिझनेस मॉडेल म्हणजे फ्री आणि प्रीमियम. या दोन शब्दांचा मिळून फ्रीमियम हा तयार झालेला आहे. यांचा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. बऱ्याचवेळा आपल्याला माहित नसत म्हणून आपण काही गोष्टी विकत घेत नाहीत. या गोष्टी खरंच आपल्याला उपयोगात येणार आहेत का ? आपण त्याचा योग्य वापर करू शकू का? किंवा आपल्याला हवे असलेले सगळे फिचर त्यामध्ये आहेत का ? इ. गोष्टींची खात्री नसल्यामुळे आपण त्या विकत घेत नाही. हा जो विरोध आहे तो तोडण्यासाठी फ्रीमियम बिझनेस मॉडेलची सुरुवात झाली आहे.

या मॉडेल मध्ये प्रॉडक्ट आधी फ्री मध्ये दिलं जात. आणि त्याचे काही अधिक फिचर वापरण्यासाठी मात्र आपल्याला पैसे द्यावे लागतात. फ्री मध्ये प्रॉडक्ट वापरण्यासाठी दिल्यामुळे ग्राहकांना काही त्रासही होतं नाही. ते लगेच वापरायला सुरु देखील करतात आणि मग ते ठरवतात की ते प्रॉडक्ट चांगलं की वाईट. आणि जर ते प्रॉडक्ट त्यांना आवडत असेल तर त्याचे बाकीचे फिचर वापरण्यासाठी आपण पैसे देऊन ते विकत घेऊ शकतो. फ्रीमियम हे अतिशय चांगलं बिझनेस मॉडेल आहे. कारण त्याचमुळे आपल्याला जास्तीतजास्त ग्राहक मिळवून देतात. खूप ग्राहकांजवळ आपल्याला एकत्रितरित्या पोचायचं असेल तर त्यासाठी फ्रीमियम खूप चांगलं बिझनेस मॉडेल आहे.
जर तुम्ही नेटभेटच उदाहरण बघितलंत तर आम्ही फ्रीमियम या बिझनेस मॉडेल मध्ये काम करतो. आमचे काही कोर्सेस हे फ्री दिलेले आहेत. जे वापरून लोकांना नेटभेटच्या ओळख होते, ऑनलाईन कोर्सेस कसे असतात ते समजत, ऑनलाईन कोर्सेस आपल्याला जमतात की नाही, ते करून आपल्याला माहिती मिळते की नाही, ओनलाईन शिकणं आपल्याला उचित आहे की नाही  हे सगळं लोकांना कळतं. आणि त्यानंतर आवडलं तर ते जे पेड कोर्सेस आहेत ते विकत घेतात.

बरेचशे मोबाईल अँप्लिकेशन हे देखील फ्रीमियम मॉडेल मध्ये काम करतात. आधी ते फ्री असतात पण त्यातील आणखी काही फिचर वापरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यानंतर सॉफ्टवेअर सुद्धा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे लोकं आधी ती इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतात. पण जर फ्री सॉफ्टवेअर असेल तर लोकं डोअवनलोड करून वापरून बघतात. आणि जर आवडलं तर मग त्याचे पैसे देतात.
फ्रीमियम बिझनेस मॉडेल मात्र सगळ्यांना देता येत नाही. डिजिटल बिझनेस मॉडेल हे फ्रीमियम बिझनेस मॉडेल मध्ये काम करतात. कारण ते जे प्रॉडक्ट जर एका व्यक्तीला फ्री मध्ये दिलं किंवा दहा व्यक्तींना फ्री मध्ये दिलं तरी त्याची कॉस्ट फारशी वाढत नाही, आणि त्यामुळे त्यांना ते परवडू शकत म्हणून  फ्रीमियम मॉडेल हे डिजिटल सर्विसेस मध्ये असत.  

५. मार्केटप्लेस बिझनेस मॉडेल :
मार्केटप्लेस म्हणजे बाजार. या बाजारात विकत देणारे  आणि विकत घेणारे सुद्धा असतात. आणि हा बाजार तयार करणारे जे असतात त्यांना मार्केटप्लेस प्लेयर्स. मॉल्स मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मॉल्स हे स्वतःहून काही विकत नाही. मॉल्समद्ये वेगवेगळी दुकाने असतात, आणि ती ग्राहकांना विकत असतात, तसाच मार्केटप्लेसच सुद्धा आहे. ऑनलाईन मार्केट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या मार्केटप्लेस कंपन्या आहेत. OLX किस्वा Quicker ह्या सेकंडहँड मालाच्या मार्केटप्लेस कंपन्या आहेत. ह्या कंपन्या स्वतःहून काही विक्री करत नाही. परंतु या कंपन्यांमध्ये सेलर्स असतात. आणि कंपन्यांमध्ये विकत घेण्यासाठी येणारे ऑनलाईन ग्राहक देखील असतात.पण मार्केटप्लेस यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त ग्राहक असले पाहिजेत. किंवा खूप जास्त सेलर्स असले पाहिजेत. खूप जास्त सेलर्स असतील तर जास्त ग्राहक येतात. आणि जर खूप जास्त ग्राहक असतील तर खूप जास्त सेलर्स येतात. त्यामुळे हा बिझनेस वाढवणं जरा कठीण आहे. पण तो जर एकदा वाढला तर त्याची पुढची पातळी गाठणं सहज सोपं आहे.

तर मित्रांनो आज आपण खूप सारे बिझनेस मॉडेल बघितले आणि मला खात्रीच हे की तुम्ही यापैकी एखादा निवडून तुमचा बिझनेस देखील सुरु करू शकता.
ऑल द बेस्ट! धन्यवाद !!

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com