१० असे मार्ग ज्यामुळे तुम्ही तुमचं व्यक्तीमत्व सुधारु शकता

access_time 2019-12-24T11:45:53.682Z face Team Netbhet Personal DevelopmentBusinessMotivational

चांगले श्रोते (Listener) बना.

चांगले श्रोते बनणे म्हणजेच काय तर समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघणे , त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांना जाणवून देणे कि त्यांच बोलण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी बोलत असू आणि समोरचा माणूस आपल न ऐकता दुसरीकडे लक्ष देत असेल तर साहजिकच ते आपल्याला आवडणार नाही पण तेच जर कोणी आपलं बोलण काळजीपूर्वक ऐकत असेल तर आपल्याला आपल बोलण मांडण सोप जातं.

जास्तीत जास्त वाचा अणि ज्ञान वाढवा.

जसं तुमचं वाचन वाढेल तुम्हाला विविध विषयांमधे आवड निर्माण होईल तुमचं ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढलं कि लोकांना तुमच्या ज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण होईल. जेव्हा तुम्ही नविन माणसांना भेटाल ही संधी असेल तुमच्यासाठी तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याची आणि त्यांच्याकडील नवीन विचार आत्मसात करुन घेण्याची.


चांगल संभाषण करायला शिका

तुम्ही किती चांगलं संभाषण करू शकता हे तुम्ही किती वाचन करता यावर अवलंबून असतं.जेव्हा तुमच्याकडे एखाद्या विषयाबद्दल माहीती असेल तेव्हाच तुम्ही त्या विषयावर बोलायला शिकू शकता. कोणीही एखाद्या विषयाबद्दल पुर्णपणे वाचू किंवा माहीती ठेवू शकत नाही , पण जर आपल्याकडे संभाषण कला असेल तर त्या गोष्टी आपण दुसर्‍यांकडून शिकू शकतो ज्या वाचण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. जर तुम्ही बोलायला लाजत असाल तर तुम्ही टोस्टमास्टर सारखे ग्रुप जॉईन करु शकता जे तुम्हाला बोलायला प्रोत्साहित करतील.

स्वत:च मत ठेवा

ज्याला स्वतःचं मत नाही अशा व्यक्तिशी बोलणे यापेक्षा दुसरी कंटाळवाणी गोष्ट नाही. अशा संभाषणांना कहीच अर्थ नसतो. मताशिवाय संभाषण म्हणजे दिशा विरहीन होऊन चालणं. तेच जर एखाद्या विषयावर दोन व्यक्तींची वेगवेगळी मतं आणि मुद्दे असतील तर तेच संभाषण अधिक मनोरंक बनतं .

नवीन लोकांना भेटा

नवनवीन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. खासकरुन अशा लोकांना भेटा ज्यांचे स्वभाव आणि विचार तुमच्या स्वभाव आणि विचारांपेक्षा वेगळे असतील. यामुळे तुम्हाला फक्त त्यांच्या संस्कृतिबद्दल नाही तर एकच गोष्ट् करण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील.

स्वतः जसे आहात तसे रहा

स्वतःच मत नसणे यासारखीच दुसरी कंटाळवाणी गोष्ट म्हणजे जे आपण नाही ते बनण्याचा प्रयत्न करणे. स्वतःला दुसर्‍यासाठी किंवा दुसर्‍यासारख बनण्यासाठी बदलणे याचे परिणाम नेहमीच उलट होतात. प्रत्येक जण वेगळा असतो आणि आपण आपला वेगळे पणा दाखवला तरच इतरांच्या नजरेत मोठे होतो. दुसर्‍याची कार्बन कॉपी बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यातला खरेपणा घालवण्यासारखं आहे.

सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन ठेवा

कोणालाच अशा लोकांबरोबर रहायला आवडत नाही ज्यांचे विचार नकारात्मक असतात ,ज्यांना खुप तक्रारी असतात किंवा ज्यांना चांगल बोलण माहीतच नसतं. खरं तर अशा माणसांपासून आपण एक हात लांबच राहण पसंत करतो. म्हणूनच असा माणूस बना जो आपल्या विचारांनी वातावरण सकारात्मक करतो आणि हे आपण तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण प्रत्येक माणसामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये चांगल बघण्याचा प्रयत्न करु.

आनंदी रहा आणि विनोदी वृत्ती  ठेवा

कोणालाही अशा माणसांची संगत जास्त आवडते जे विनोदी वृत्तीचे असतात. गंभीर वृत्तीच्या माणसांबरोबर तुम्हाला जास्त माणसं कधीच दिसणार नाहीत. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी रहायला शिका. गंभीर परिस्थितीकडे सुध्दा विनोदी दृष्टीकोनातून पाहता आलं पाहीजे.

दुसर्‍यांना मदत करा

दुसर्‍यांना मदत करणे हा एक महत्त्वाचा गुण आहे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी . जस तुम्हाला एखाद्या माणसाने मदत केली तर आवडतं तसच तुम्हीही दुसर्‍याची मदत करा जेव्हा एखाद्याला तुमच्या मदतीची गरज असते. प्रत्येकालाच अशी माणसं आवडतात जी आपल्यावर विश्वास ठेवतात. आपण कधी पडलो तर उठायला मदत करुन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करतात.

इतरांचा आदर करा

दुसर्‍यांकडून आदर आणि प्रशंसा हवी असेल तर आपल्या शब्दांबरोबर खरं आणि प्रामाणिक राहता आलं पाहीजे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी फक्त दुसर्‍यांसाठीच नाही तर स्वतः बद्दल सुध्दा आदर असला पाहीजे. एक माणूस म्हणून आपल्याकडे ती क्षमता आहे कि आपण आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. जेव्हा आपण स्वतःला विकसित करण्यासठी आपल्याकडून होणारे सगळे प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतः बरोबरच दुसर्‍यांच्या आनंदात योगदान देत असतो.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

धन्यवाद,
टिम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy