ग्राहकांकडून रेफरल्स मिळवून आपला बिझनेस वाढवा

access_time 2019-12-28T12:11:16.186Z face Team Netbhet BusinessMarketingSales

ग्राहकांकडून रेफरल्स मिळवून आपला बिझनेस वाढवा :-

माऊथ पब्लिसिटी हा कोणत्याही कंपनीच्या किंवा ब्रँडच्या मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्यांचा ग्राहकवर्ग हा साधारणपणे आधीच्या ग्राहकांच्याच संदर्भातून तयार होतो. तथापि, असा ग्राहक वर्ग आणि त्यांचे रेफरन्स मिळवण्यासाठी  ब्रॅण्डसनी त्यांच्या महत्त्वाच्या आणि आघाडीच्या क्लायंट्सना तयार करण्याची गरज असते.रेफरल्स सहज आणि नैसर्गिकरित्या मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो.आजच्या डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचणे शक्य झालेआहे.तरीही कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये खालील बाबींचा वापर करणे आणि गोष्टी अंमलात आणणे आवश्यक आहे.

 लिंक्डइनचा वापर करा 

लिंक्डइनचा वापर  हा ब्रँडला संभाव्य क्लायंट आणि ग्राहकांना जाणून घेण्याचा एक चांगला पर्याय आहे. एखादी व्यक्ती किंवा कंपनी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लिंक्डइन हा एक चांगला पर्याय आहे. आपल्या ग्राहकांना रेफरल्सबद्दल विचारण्याऐवजी, लिंक्डइनवर लीड शोधून हवे तसे संदर्भ मिळवणे ही  हे अधिक सोपे आहे.आपल्या क्लायंटसोबत कोण जोडले गेले आहे तसेच आपल्या कंपनीसाठी आवश्यक असणारे ग्राहक आहेत कि नाही हे आपण पाहू शकतो.

 समाधानी ग्राहकांना आकर्षित करा. 

एखाद्या कंपनी किंवा प्रोडक्ट बद्दल चांगला,सकारात्मक अनुभव मिळाल्यानंतर ग्राहक त्या कंपनीचा संदर्भ इतरांना नक्कीच देतात.अश्या ग्राहकांना कंपनीतर्फे मिळणाऱ्या सेवा किंवा उत्पादनाबाबत नियमितपणे योग्य माहिती वेळोवेळी दिली गेली तर हेच ग्राहक कंपनीबद्दल चांगली पब्लिसिटी करू शकतात. अश्या ग्राहकांना प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरते.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
 

 रेफरल्ससाठी टेम्पलेट वापरा 

संपूर्ण रेफरल देवाणघेवाण प्रक्रिया सोपी करण्यासाठी ई-मेल मध्ये किंवा सॅम्पल ई-मेल मध्ये टेम्प्लेट सारखी सुविधा पुरवणे आवश्यक असते.जेणेकरून ग्राहक जेव्हा इतरांकडे  संदर्भासाठी विचारणा करतील त्यावेळेस संपूर्ण प्रक्रिया टाळून फक्त नाव आणि संबंधित रेफेरल्स बद्दल विचारणा करणे सोपे जाईल.

 चांगल्या अभिप्रायांचा योग्य जागी वापर 



चांगले रेफेरल्स तेव्हाच मिळतात जेव्हा कंपनी स्वतःची क्षमता आणि गुण सिद्ध करतेआणि ग्राहक आणि क्लाएंट्सना सुद्धा कंपनीविषयी खात्री होते.अश्या वेळी मिळालेले चांगले अभिप्राय इतरांसोबत शेअर करा. त्यामुळे अजून सकारात्मक अभिप्राय आणि संदर्भ मिळण्यास सोपे जाईल. ज्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या अभिप्रायाला प्रोत्साहन दिले जाते त्यावेळी  ते इतर क्लायंटला त्या ब्रँडबद्दल चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात.

 नवनवीन ऑफर्सचे प्रोत्सहन 

कोणत्याही ग्राहकांना ब्रँड रेफरल्स देणे आवश्यक नाही. दरवेळी नवीन ऑफर्स प्रदान करणे हे रेफेरल्स मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.म्ह्णूनच खूपसे  ब्रॅण्डस अश्या क्लाएंट्सवर नवीन ऑफर्सचा प्रस्ताव देतात जे त्यांना कॉन्टॅक्टस डेटा पुरवतात.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,

टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com