महेंद्रसिंग धोनी कोणत्याही परिस्थितीत शांत कसा राहतो ?

access_time 2020-01-16T08:08:42.035Z face Team Netbhet Personal DevelopmentMotivational

2016 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हाची गोष्ट.  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात धोनी बोलत होता. तेव्हा एका विद्यार्थ्याने धोनीला विचारलं, " की परीक्षेच्या काळात एवढा तणाव असतो, त्यावेळी तुझ्या सारखं शांत आणि संयमी कसं राहता येईल?"

यावर धोनीने उत्तर दिलं की तो स्वतः हा महत्वाचा धडा त्याच्या वडिलांकडून शिकला. 
त्याला एकदा परीक्षेच्या दिवसातच क्रिकेटची महत्वाची मॅच खेळायला जायचं होतं. 
त्यासाठी त्याने वडिलांची परवानगी मागितली असता, ते म्हणाले , "अगर साल भर पढाई की हो, तो एक दिन से फरक नही पडेगा !

अगर सालभरसे पढाई नही की हो, तो एक दिन से फरक नही पडेगा  !"

जर वर्षभर मेहनत केली असेल तर एका दिवसाने फरक पडत नाही ! एका दिवसाच्या मेहनतीने नाही, तर रोज केलेल्या कष्टानेच  आत्मविश्वास येतो, कौशल्य येते, कला येते, एक्स्पर्ट बनता येते आणि अंतिमतः यश मिळवता येते !!


================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
===============

धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy