कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास कसा वाढवाल?

access_time 2019-12-26T05:35:35.346Z face Team Netbhet Personal DevelopmentMotivationalBusiness

तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी  असे वाटू शकते कि आपण जे काम करतोय ते आपल्यासाठी अगदीच सोप्प आहे. किंवा याच्या विरुद्धहि वाटू शकते कि आपल्याला काहीच जमत नाहीय.असे विचार निराशजनक आहेत खरे.पण अश्या विचारांना पळवून लावून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक कसे राहता येईल हे पाहू. 

आपल्या शब्दांवर/वचनांवर वर ठाम राहणे.

जर तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण करण्याचे वचन दिले असेल तर आपल्या शब्दांवर ठाम रहा आणि कामाची डेडलाइन पाळून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करा.यामुळे तुमच्या क्षमतेची जाणीव तुमच्या सहकार्यांना आणि वरिष्ठांना देखील होईल.तुमच्या बद्दलचा दृष्टिकोन सकारत्मक होईल. ऑफिस मध्ये जर कोणाला तुमच्या मदतीची गरज असेल तर नक्की मदत करा.त्यामुळे तुमची विश्वासहर्ता वाढेल. तुमची एक चांगली प्रतिमा तयार होईल अश्या सकारात्मक गोष्टी  तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील.

स्वतःचे ज्ञान वाढवा

कामासंदर्भातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असे नाही.ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत पण त्यांचा उपयोग आपल्याला पुढे कधीतरी होणार आहे अशा गोष्टी शिकून घेण्याकडे आपला कल असला पाहिजे.त्यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच, आपला आत्मविश्वासहि नक्कीच वाढतो.वाचन,मनन तसेच इंटरनेटमुळे आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी खूपसे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.त्यांचा वापर करून आपण आपले ज्ञान अजून वृद्धिंगत करू शकतो.

स्वतःचे प्रवक्ते स्वतःच बना.   

तुम्ही केलेल्या कामाचे मापन आधी स्वतः करून पहा. जर तुम्ही स्वतःच्या कामांबाबत समाधानी असाल,तर तुमच्या कामाचे श्रेय इतर कोणालाही देण्याची गरज नाही.बरेचदा काही प्रवृत्तीच्या व्यक्ती इतरांच्या कामाचे  कौतुक ते स्वतःच केल्यासारखे करतात आणि स्वतःला म्हह्त्व अथवा श्रेय मिळेल या प्रयत्नात असतात. त्यामुळे अशा बाबतीत आपण केलेले काम आपणच सादर करून इतरांना स्वतःची कार्यक्षमता पटवून देणे हे देखील महत्त्वाचे ठरते.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

मैत्रीपूर्ण वातावरण

तुमच्या कामांचा ताण इतरांसमोर व्यक्त न करता नेहमी हसतमुख राहणे हे खरेतर खूप कठीण आहे पण एकदा हे करणे साध्य झाले तर मग तुम्ही इतरांसाठी आदरयुक्त व्यक्तिमत्त्व ठरता.

तुमच्या अचिव्हमेंट्स शेअर करा.

 ऑफिसमध्ये लहानातले लहान यश देखील स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. आपण केलेल्या कामाबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल प्रामाणिकपणे वरिष्ठांशी बोलणे हेहि तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे तुमची कार्यक्षमता त्यांच्या लक्षात राहते आणि पुढील प्रोजेक्ट साठी ते तुमचा विचार नक्कीच करू शकतात.

सपोर्ट सिस्टम तयार करणे.

ऑफिसमध्ये तुमच्या कामाला सपोर्ट करणारे सहकारीच खरतर तुमची सपोर्ट सिस्टिम असते. सहकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करणे,आपापली मते सादर करणे,इतर विषयांची चर्चा या सर्व गोष्टी एकंदरीत वातावरण हलकंफुलकं ठेवण्यास मदत करतात.त्यामुळे कामाचा ताण हलका होण्यास पर्यायाने काम उत्सहात आणि आत्मविश्वासाने पूर्ण करण्यास मदत होते.स्वतःला नेहमी समृद्ध आणि सकारात्मक  सहकाऱ्यांच्या वातावरणात ठेवा.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
 
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com
 
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy