कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

access_time 2019-12-28T11:54:09.771Z face Team Netbhet BusinessInnovationEntrepreneurship

खुप खुप वर्षांपुर्वी एका माणसाने "पपेर मिल" चा व्यवसाय सुरु केला.
व्यवसाय चांगला चालू लागला...तेव्हा त्याला आणखी एक पेपर मिल सुरु करावीशी वाटली
....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
त्याने दुसरी मिल सुरु केली. व्याप वाढत होता. म्हणून त्याने आपल्या मित्राला सोबतीला घेतले.
त्याचा हा मित्र हुषार होता. त्याने पाहिले की "वीज निर्मीती" हा भविष्यातील एक चांगला उद्योग होऊ शकतो.
त्या कंपनीने वीज निर्मीती सुरु केली !
....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
हा मित्र पुढे कंपनीचा चेअरमन झाला. कंपनीचा व्याप वाढत होता. त्या कंपनीकडे पाहून इतरही अनेकजण वीजनिर्मीती कडे वळले. स्पर्धा वाढली.
त्याने ३-४ कंपन्यांना सांगीतले की आपण एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र मिळून काम केले तर खुप मोठे होउ. आणि तसे एकत्र काम सुरु केले.
कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !
पुढे कंपनी आणखी एका महत्त्वाच्या उद्योगात उतरली "रबर"च्या !

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

"रबर" साठी कंपनीला "सोव्हीएट युनिअन"च्या रुपाने मोठा ग्राहक मिळाला, "सोव्हीएट युनिअन"मध्ये व्यवसाय करत असताना कंपनीला जाणवले की

"इलेक्ट्रॉनिक्स"ची मागणी वाढते आहे, कंपनीने लगेचच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवायला सुरु केली.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

तेव्हाचा काळ हा शीत युद्धाचा होता. अमेरिका आणि सोव्हीएट युनिअन मध्ये छुपं युद्ध चालू होतं. या कंपनीला अमेरिकन सैन्यदलाने गाठले आणि

सोव्हीएट युनिअनला कोणती उत्पादने पुरविली जात आहेत, याची माहिती मागीतली.

अमेरिकेला ही माहिती पुरविण्यासोबत आपली उत्पादनेही विकायला या कंपनीने सुरु केले.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

पुढे ही कंपनी टेलिव्हीजन च्या उद्योगात उतरली आणि मोठी झाली. युरोपातील तिसरे सर्वाधिक टीव्ही उत्पादन करणारी ही कंपनी बनली.

पण पुढे टीव्हीचा खप कमी होऊ लागला म्हणून या कंपनीने टीव्हीचे उत्पादन बंद करायला मागे पुढे पाहिले नाही.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

आता कंपनीला नविन कंप्युटरचे नविन क्षेत्र खुणावत होते. याही क्षेत्रात कंपनीने मुसंडी मारली. नंतर नवा सीईओ आला.

त्याने पाहिले की कंपनीचा पसारा प्रचंड वाढला आहे आणि तो सांभाळण्यात कंपनीचा वेळ आणि पैसा खर्च होतोय.

नव्या सीईओने अनेक उद्योग बंद केले आणि एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित केले

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

ज्या क्षेत्रात या कंपनीने लक्ष केंद्रित केले त्यामध्ये तर कमालीची प्रगती केली. अगदी जगभर कंपनीचे नाव झाले.

इतके की जगातील पहिल्या पाच टॉप ब्रँड्स मध्ये या कंपनीचे नाव आले.

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

कंपनीच्या सुरुवाती पासून एवढी भरभराट झाली की कधी या कंपनीचं काही वाईट होईल असं कुणालाच वाटलं नाही.

दुर्दैवाने तसं झालं नाही. पुढच्या फक्त ५ वर्षात कंपनीची पिछेहाट झाली. इतकी की कंपनी बंद पडायला आली..... कारण माहिती आहे...

....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून *घेतलं नाही* !

म्हणतात ना, नाव कमवायला पुर्ण आयुष्य लागतं पण ते हरवायला एक चुक पण पुरेशी ठरते....या कंपनीच्या बाबतीत हे शब्दशः खरे ठरले.

काय मित्रांनो, लक्षात आलं का ? मी कोणत्या कंपनी बद्दल बोलतोय ?

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल की ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय ती आहे "नोकिया" !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com