इंटरनेट तुमचा बिझनेस "असा" बदलू शकतो !

access_time 2019-12-31T06:00:44.878Z face Salil Chaudhary BusinessDigital MarketingSocial Media MarketingStart up

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक वेळेला जेव्हा मी उद्योजकांना किंवा उद्योग सुरु करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा लक्षात येते की कित्येक जण त्यांच्या बिझनेसचा नव्याने विचार करतच नाहीतच. किंबहुना ते त्यांच्या लक्षातच येत नाही. 
इंटरनेट आसपासचे सर्वच बिझनेसेस पुर्णपणे बदलून टाकताना आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत तरीही आपण स्वतः याच इंटरनेटला हाताशी घेऊन आपल्या पुर्वापार चालत आलेल्या बिझनेस प्रोसेसेचा नव्याने विचार करतच नाही. इंटरनेट हे काही वेगळे तंत्रज्ञान राहिले नसून "ईंटरनेट हाच बिझनेस" आहे हे आपण नीट ध्यानात घेऊन आपली पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी आपण आपल्या बिझनेस मध्ये करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरनेट द्वारे कसा बदल करु शकतो याचा विचार केला पाहिजे.

या लेखात आज आपण याचीच काही उदाहरणे पाहूया - 

१. सुरुवात वेबसाईट पासून करा -

आपण सरधोपट असा विचार करतो की कोण माझी वेबसाईट बघणार आहे ? माझ्या ग्राहकांना वेळच नसतो किंवा गरज लागलीच तर ते थेट फोन वर बोलतील. पण मित्रांनो, जे लोक तुम्हाला ओळखतच नाहीत अशा नव्या लोकांना ग्राहक बनवायचे असेल तर आपण त्यांना भेटण्यासाठी एक ठिकाण बनवले पाहिजे आणि ते ठिकाण म्हणजे "वेबसाईट". वेबसाईट म्हणजे एक असा सेल्समन आहे जो सुट्टी मागत नाही, पगार वाढवून मागत नाही, कामाचा कंटाळा करत नाही आणि २४ तास , ३६५ दिवस तुमच्यासाठी काम करतो.

वेबसाईट बनवणं फार कठीण किंवा महाग आहे असेही नाही. अगदी स्वस्तात आणि केवळ ३-४ दिवसांतच तुम्ही स्वतःची वेबसाईट कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय बनवू शकता. कसे ते पहायचे असेल तर येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/WP1

२. ऑनलाईन विकायला शिका -

आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहक येण्याची वाट बघू नका. ग्राहकांसाठी त्यांचा वेळ सगळ्यात महत्त्वाचा असतो. जेवढा तुम्ही ग्राहकांचा वेळ वाचवणार तेवढा तुमचा बिझनेस वाढणार हे समीकरण लक्षात घ्या. दररोज ५०-१०० ग्राहकांपर्यंत पोचण्यापेक्षा दररोज हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे "ई-कॉमर्स". ईकॉमर्सच्या माध्यमातून आपला बिझनेस कसा वाढवायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/ecom.html

३. मार्केटींग पण "डिजिटल" झाली आहे -

जर तुम्ही ग्राहकाला दिसलातच नाही तर ग्राहक तुमचे उत्पादन विकत कसे घेणार? ग्राहकाला दिसणे, त्याचे अटेंशन मिळविणे ही आज सगळ्यात कठीण गोष्ट झाली आहे. वर्तमानपत्र, मासिके कोणी वाचत नाहीत, टीव्ही वरच्या जाहिराती देखिल कोणीच पाहत नाहीत. रस्त्यांवर लावलेले बॅनर्स देखिल हल्ली वाचले जात नाहीत. कारण प्रत्येकाकडे आपली स्वतःची हक्काची स्क्रीन आहे. ती स्क्रीन म्हणजे "स्मार्टफोन". या स्क्रीन मध्ये जर तुम्ही दिसत नसलात तर तुम्ही अस्तित्वातच नाहीत असे समजा.

डिजिटल मार्केटिंग शिवाय तुमचा व्यवसाय कधीच मोठा होऊ शकणार नाही. यासाठी डिजिटल मार्केटिंग/ सोशल मिडीया मार्केटिंग म्हणजे काय ते नक्की शिका. त्याबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हीडीओ पहा - https://www.youtube.com/watch?v=cewjydf-DOY&

४. आपल्या स्पर्धकांबद्दल माहिती घ्या -

आपले स्पर्धक नेमके काय करत आहेत. त्यांच्या नविन योजना, उत्पादने, ऑफर्स काय आहेत याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुर्वीच्या काळी हे काम करणे सहजशक्य नव्हते. पण आता मात्र इंटरनेट मुळे हे काम सोपे झाले आहे. आपल्या आसपासचेच नव्हे तर, शहरातले, राज्यातले, देशातले, परदेशातले आपल्यासारखाच व्यवसाय करणारे लोक नेमके काय करत आहेत? काय वेगळं करत आहेत ? त्यांचे ग्राहक कोण आहेत ? त्यांच्या ग्राहकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत याचा अभ्यास सोशल मिडीया मधून करता येतो. 
कसे ते पहायचे असेल तर येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Facebook-Marketing-Expert

५. आपल्या अंतर्गत पध्दती ( Internal Processes) बदला -

इंटरनेट वरील अनेक वेबसाईट आणि अ‍ॅप्स आता बिझनेसच्या जुन्या प्रोसेसेस बदलत आहेत. ग्राहकांचा डेटा साठवणे, त्यांना ऑटोमॅटिक ऑनलाईन बिल/ इन्वॉईस / कोटेशन्स पाठवणे शक्य झाले आहे. आपल्या व्यवसायासाठी लागणारी खरेदी, आपल्या सोबत काम करणार्‍या लोकांचे व्यवस्थापन, कच्च्या मालाचे व उत्पादनाचे व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी पुर्णपणे ऑटोमॅटीकली करु शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हीडीओ पहा - https://www.youtube.com/watch?v=RyRAVeG-gwI

मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे इंटरनेट हे काही वेगळे तंत्रज्ञान राहिले नसून "ईंटरनेट हाच बिझनेस" आहे हे पक्क लक्षात ठेवा. आपल्या लघुउद्योगाला मोठं करायचं असेल तर "ऑनलाईन विचारसरणी" आत्मसात करा. म्हणूनच तुमची सुरुवात असेल किंवा तुम्ही गेल्या काही वर्षांपासून उद्योग मोठा करण्याच्या प्रयत्नात असाल तर फक्त आपल्या विचारसरणी मधला "ऑनलाईन" बदल करुन बघा ! तुमचा बिझनेस नक्कीच साता-समुद्रापार जाईल यात शंका नाही.

================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================

वर्ष २०२० साठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com